Breaking News

R Ashwin ने तोडले भारतीय क्रिकेट सोबतचे नाते, 19 वर्षांचा प्रवास संपला

r ashwin
Photo Courtesy: X

R Ashwin Retired From IPL: भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने आपल्या कारकिर्दीविषयी मोठा निर्णय घेतला आहे. मागील वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या अश्विनने भारतीय क्रिकेटसोबत खेळाडू म्हणून असलेले आपले नाते संपवले आहे. त्याने बुधवारी (27 ऑगस्ट) आपण आयपीएलमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. तसेच, जगभरातील लीग खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले.

R Ashwin Retired From IPL

अश्विनने सोशल मीडिया पोस्ट करत आपण आयपीएलमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. एक नवी सुरुवात म्हणून जगभरातील लीग खेळण्याचा आपला प्रवास सुरू होत असल्याचे त्याने म्हटले. त्यामुळे कोणत्याही विदेशी लीगमध्ये खेळल्यास तो भारतीय क्रिकेटमध्ये कोणतीही स्पर्धा खेळण्यासाठी पात्र ठरणार नाही. अश्विन याने 2006 मध्ये आपले प्रथमश्रेणी पदार्पण केले होते. त्यामुळे भारतीय क्रिकेटसोबत असलेला त्याचा 19 वर्षांचा प्रवास संपला.

अश्विनने 2009 मध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएल पदार्पण केले होते. 2015 पर्यंत तो चेन्नई संघाचाच भाग होता. त्यानंतर त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्स, किंग्स इलेव्हन पंजाब, दिल्ली कॅपिटल्स व राजस्थान रॉयल्स या संघाचे प्रतिनिधित्व केले. तर, 2025 मध्ये पुन्हा एकदा त्याने चेन्नईसाठी हंगाम खेळला. आयपीएल कारकीर्दीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 221 सामन्यात 187 बळी टिपलेले.

अश्विन याची आयपीएल 2025 मधील कामगिरी तितकी शानदार राहि राहिली नव्हती. त्यामुळे अश्विन याला रिलिज अथवा ट्रेड करण्याची चर्चा सुरू झालेली. मात्र, त्याच्या आयपीएल निवृत्तीने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

हे देखील वाचा- ब्रेकिंग! Cheteshwar Pujara चा क्रिकेटला अलविदा, दोन दशकांच्या दैदिप्यमान कारकिर्दीची समाप्ती

Exit mobile version