Breaking News

अखेर 43 व्या वर्षी MS Dhoni रिटायरमेंटवर बोललाच! म्हणाला, “ही फ्रॅंचायझी मला…”

MS DHONI
Photo Courtesy: X

MS Dhoni On His IPL Retirement: आयपीएल 2025 (IPL 2025) च्या तिसऱ्या सामन्यात प्रत्येकी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारे चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स (CSKvMI) समोरासमोर येणार आहेत. या सामन्यात दोन्ही संघ नव्या कर्णधारासह उतरतील. त्याचवेळी चेन्नईचा माजी कर्णधार व दिग्गज एमएस धोनी (MS Dhoni) याने आपल्या निवृत्तीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. 

MS Dhoni On His IPL Retirement

धोनीने हंगामातील पहिल्या सामन्याआधी प्रसारण वाहिनीला एक मुलाखत दिली. यामध्ये त्याच्या निवृत्तीच्या प्रश्ना वेळी बोलताना तो म्हणाला, “मला वाटते तोपर्यंत मी खेळू शकतो. ही माझी फ्रॅंचायझी आहे. अगदी मी व्हीलचेअरवर आलो तरी, मला ते ओढून आणतील.”

यावेळी संघाचे सध्या नेतृत्व करणारा ऋतुराज गायकवाड धोनीविषयी म्हणाला, “एमएस अजूनही नेट मध्ये चांगली फलंदाजी करत आहे. नुकतेच आपण सचिन तेंडुलकर यांना खेळताना पाहिले. वयाच्या पन्नाशीनंतरही ते कसे खेळतात हे आपल्याला दिसले आहे. तशी एमएसकडे अजून बरीच वर्ष शिल्लक आहेत.”

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

धोनी सध्या 43 वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने 2020 मध्ये निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर दरवर्षी धोनी निवृत्त होणार अशी चर्चा सुरू होते. मात्र, त्याने आत्तापर्यंत असा निर्णय घेतलेला नाही. आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर देखील त्याने चेन्नईचे नेतृत्व करताना दोन वेळा संघाला विजेतेपद मिळवून दिले. मागील वर्षी त्याने स्पर्धेच्या एक दिवस आधी कर्णधार म्हणून राजीनामा देत ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्व सोपवले होते. यावेळी चेन्नई येथे सराव सत्रासाठी येताना, त्याने ‘वन लास्ट टाईम’ अशा सांकेतिक भाषेचा शर्ट परिधान केला होता. त्यामुळे हा नक्की त्याचा खरच हंगाम आहे का असा प्रश्न विचारला जात आहे.

(MS Dhoni On His IPL Retirement)

हे देखील वाचा- IPL 2025: स्टंप्सला बॅट मारली तरी नरीन नॉट आऊट का? काय आहे नियम 35.2

आयपीएल 2025 मध्ये Ajinkya Rahane ची धमाकेदार सुरूवात! पाहा नेत्रदीपक षटकारांचा व्हिडिओ

 

 

Exit mobile version