Breaking News

Harshit Rana च्या टीम इंडियातील एंट्रीने माजला गदारोळ, नक्की घडलं काय? 1 विकेट अणि…

harshit rana
Photo Courtesy: X

Netizens React On Harshit Rana Inclusion In Team India: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा (India Tour Of England 2025) 20 जूनपासून सुरू होत आहे. पाच सामन्यांची ही मालिका सुरू होण्यासाठी दोन दिवसांचा अवधी शिल्लक असताना, भारतीय गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या दौऱ्यासाठी अचानक वेगवान गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) याला संधी दिली गेली. त्यामुळे भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्यावर चौफेर टीका होतेय.

Netizens React On Harshit Rana Inclusion In Team India

भारत अ संघासह इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या राणा याला संघ व्यवस्थापनाने बॅकअप गोलंदाज म्हणून इंग्लंडमध्येच राहण्यास सांगितले. कदाचित त्याला या दौऱ्यावर खेळण्याची संधी मिळू शकते. मात्र, या निवडीने वाद निर्माण झाला आहे. भारत अ संघासाठी इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या अंशुल कंबोज (Anshul Kamboj) याला डावलून राणा याला संधी दिल्याचे बोलले जातेय्. इंग्लंड लायन्सविरुद्ध अंशुल याने पाच बळी मिळवले होते. तर, एक अर्धशतकी खेळी देखील त्याने केली होती.

दुसरीकडे राणा याला केवळ एक बळी मिळवता आला होता. तसेच, देशांतर्गत हंगाम व आयपीएलमध्ये देखील राणा फॉर्ममध्ये दिसला नव्हता. केवळ गौतम गंभीर याच्या जवळचा खेळाडू म्हणून, त्याला संधी मिळाल्याचे बोलले जातेय. यापूर्वी राणा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघासोबत गेला होता. तर, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मोहम्मद सिराज याला बाहेर करत, राणाला भारतीय संघात स्थान दिले गेलेले.

Harshit Rana For India Tour Of England 2025

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: या आहेत 2031 पर्यंतच्या ICC Tournaments! तिघांचे यजमानपद भारताकडे

 

Exit mobile version