Breaking News

अखेर बुमराहविनाच टीम इंडिया खेळणार Champions Trophy 2025, संघात दोन महत्त्वाचे बदल

champions trophy 2025
Photo Courtesy: X

No Jasprit Bumrah In Champions Trophy 2025: पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेसाठी संघ बदल करण्याची अखेरची तारीख 11 फेब्रुवारी होती. या अखेरच्या दिवशी भारतीय संघात दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. दुखापतीमुळे अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. 

https://twitter.com/BCCI/status/1889372858058744075

Jasprit Bumrah Ruled Out From Champions Trophy 2025

जसप्रीत बुमराह याचा यापूर्वी घोषित केलेल्या संघात समावेश होता. मात्र, त्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह लागलेलेच होते. त्यामुळेच युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आलेली‌. आता बुमराह तंदुरुस्त नसल्याने अखेर त्याला संघातून बाहेर करण्यात आले. त्याच्या जागी राणा याचा संघात समावेश केला गेला आहे. राणाने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केलीये.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

यासोबतच, युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याला बाहेर करून त्याच्याजागी फिरकीपटू वरूण चक्रवर्ती याला संघात समाविष्ट केले गेले आहे. आता जयस्वाल, शिवम दुबे व मोहम्मद सिराज हे नॉन ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह असतील. आणीबाणीच्या परिस्थितीत ज्याची गरज असेल तो खेळाडू दुबईला रवाना होईल.

चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

No Jasprit Bumrah In Champions Trophy 2025

बहुप्रतिक्षित Champions Trophy 2025 चे वेळापत्रक जाहीर, पाहा टीम इंडिया कुठे आणि कधी खेळणार?

Exit mobile version