
Patna Pirates Release Randeep Dalal: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) मध्ये चमकदार कामगिरी झाल्यानंतरही पटना पायरेट्स संघाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. संघाच्या यशात सर्वात मोठा वाटा उचलणारे प्रशिक्षक रणदीप दलाल यांना संघाने मुक्त केले. त्यांच्या या निर्णयाने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Patna Pirates Release Randeep Dalal
पीकेएल 2025 मध्ये पटना संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. त्यांनी आपल्या पहिल्या 13 सामन्यात केवळ 3 विजय मिळवले होते. त्यानंतर संघाचे प्रशिक्षक अनुप कुमार (Anup Kumar) यांनी वैयक्तिक कारणाने संघाची साथ सोडली. त्यांच्या जागी रणदीप दलाल यांची नियुक्ती केली गेलेली. त्यांच्या मार्गदर्शनात संघाने उर्वरित पाच सामने जिंकून प्ले ऑफ्ससाठी पात्रता मिळवली. त्यानंतरही सलग तीन सामन्यात त्यांनी विजय मिळवत क्वालिफायर 3 पर्यंत मजल मारली. संघाच्या या कामगिरीचे श्रेय दलाल यांना दिले गेले.
हंगाम संपल्यानंतर अनुप कुमार यांना पटना संघाने करारमुक्त केलेले. त्यानंतर आता दलाल यांना देखील संघाने नारळ दिला. मागील चार हंगामापासून पटना पायरेट्स सातत्याने आपल्या मुख्य प्रशिक्षकाला बदलत असल्याचे दिसते. त्यामुळे संघ व्यवस्थापनात सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट होते. (Kabaddi News)
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: WTC च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार Freedom Trophy 2025! जगज्जेत्यांना रोखणार का टीम इंडिया?