Breaking News

Rahul Dravid यांचे कोच म्हणून कमबॅक? ‘या’ आयपीएल संघासोबत बोलणी पक्की, विक्रम राठोडही देणार साथ

rahul dravid
Photo Courtesy: X/BCCI

Rahul Dravid Comeback As Coach In IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) प्रशिक्षक म्हणून पुनरागमन करण्यास सज्ज झाले आहे. आगामी आयपीएल हंगामात ते राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारणार असल्याचे वृत्त समोर येतेय. त्यांच्यासोबतच भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक राहिलेले विक्रम राठोड (Vikram Rathore) हे देखील राजस्थानसोबत सहाय्यक प्रशिक्षक म्हणून जोडले जातील.

एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल द्रविड व राजस्थान रॉयल्स यांच्यातील बोलणी समाप्त झाली असून, द्रविड आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. यापूर्वी देखील द्रविड यांनी राजस्थानसाठी 2014 व 2015 मध्ये मुख्य प्रशिक्षक पद सांभाळले होते. नुकतेच द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट संघाने टी20 विश्वचषक जिंकला आहे. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ समाप्त झाला होता.

राहुल द्रविड यांच्यासह भारतीय संघाचे 5 वर्ष फलंदाजी प्रशिक्षक राहिलेले विक्रम राठोड संघाचे सहाय्यक प्रशिक्षक असतील. यासोबतच सध्या मुख्य प्रशिक्षक असलेला कुमार संगकारा हा डायरेक्टर ऑफ क्रिकेट हे पद स्वीकारेल. तो राजस्थान रॉयल्स व्यतिरिक्त पार्ल रॉयल्स व बार्बाडोस रॉयल्स या संघांसाठी देखील काम पाहिल.

(Rahul Dravid set to be appointed as the new Head Coach of Rajasthan Royals)

या दिवशी सुरू होणार PKL 2024, तारखांसह ठिकाणेही जाहीर, पुण्याचे सामने…

Exit mobile version