Breaking News

या दिवशी सुरू होणार PKL 2024, तारखांसह ठिकाणेही जाहीर, पुण्याचे सामने…

Photo Courtesy: X/Pro Kabaddi

PKL 2024: जगातील सर्वात भव्य कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) स्पर्धेच्या पुढील हंगामाच्या तारखांबाबत माहिती समोर आलेली आहे. पीकेएल 2024 (PKL 2024) ची सुरुवात 18 ऑक्टोबरपासून होईल. बारा संघांच्या या स्पर्धेतील साखळी सामने तीन शहरांमध्ये खेळले जाणार आहेत. पीकेएल 11 (PKL 11) च्या प्ले ऑफचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.

पीकेएल 2024 ची सुरुवात 18 ऑक्टोबरपासून हैदराबाद येथील गच्चीबावली इंडोर स्टेडियम येथे होईल. त्यानंतर 10 नोव्हेंबर पासून नोएडा येथे सामने होणार आहेत. साखळी फेरीतील अखेरचे ठिकाण पुणे येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल. येथे 3 डिसेंबरपासून सामने होतील. यापूर्वी ही स्पर्धा सहभागी सर्व 12 फ्रॅंचाईजींच्या शहरात होत असत. पुणेरी पलटण हे प्रो कबड्डी लीगच्या मागील हंगामाचे विजेते आहेत.

(PKL 2024 Dates And Venues Announced)

सांगलीच्या Sachin Khilari ने पॅरिस पॅरालिंपिक 2024 मध्ये फडकवला तिरंगा! गोळाफेकीत भारताच्या पारड्यात टाकले रौप्य

Exit mobile version