Breaking News

Team India New Head Coach| दिग्गजाने दाखवली BCCI च्या ऑफरला केराची टोपली, थेट म्हणाला, “नो”

team india new head coach
Photo Courtesy: X/BCCI

Team India New Head Coach|भारतीय क्रिकेट संघाला लवकरच नवा मुख्य प्रशिक्षक भेटणार आहे. आगामी टी20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड हे आपल्या पदावरून पायउतार होतील. बीसीसीआयने (BCCI) नव्या प्रशिक्षकाच्या निवडीसाठी जाहिरात देखील काढली असून, त्याला प्रतिसादही मिळत आहे.

असे असले तरी, बीसीसीआय काही नावांबाबत आग्रही आहे. त्यामुळे बीसीसीआयचे पदाधिकारी काही माजी खेळाडूंसोबत थेट संपर्क साधत आहेत. त्यापैकी त्यांनी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग (Ricky Ponting) याला देखील प्रस्ताव दिला होता. मात्र, त्याने हा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिल्याचे स्पष्ट केले.

स्वतः पॉंटिंग याने याबाबत बोलताना म्हटले, “मला बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, मी त्यांचा प्रस्ताव नाकारला आहे. मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर जास्त वेळ हा संघालाच द्यावा लागतो. मात्र, माझे एक कुटुंब आहे व माझी आता पहिली जबाबदारी ते आहेत. मला सर्वाधिक वेळ त्यांनाच द्यायचा आहे.”

पॉंटिंग सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. तो 2019 पासून दिल्ली संघासोबत जोडला गेला असला तरी, संघाला केवळ एकाच वर्षी अंतिम फेरीत प्रवेश करता आला होता. मागील चार वर्षात दिल्ली एकदाही प्ले ऑफ्समध्ये पोहोचू शकली नाही.‌

बीसीसीआय आता भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर, श्रीलंकेचा माहेला जयवर्धने, ऑस्ट्रेलियाचा जस्टिन लँगर व न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग यांच्याशी संपर्कात असल्याचे वृत्त आहे. या सर्वात सध्या तरी गौतम गंभीर याचे नाव आघाडीवर असून, बीसीसीआयचे पदाधिकारी व काही खेळाडू त्याच्या नावासाठी आग्रही आहेत.

(Ricky Ponting Denied Team India New Head Coach Offer)

One comment

  1. I’d forever want to be update on new blog posts on this site, saved to favorites! .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version