Breaking News

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘द हिटमॅन शो’! 92 धावांच्या इनिंगमध्ये Rohit Sharma ने बनवली विक्रमांची लांबलचक यादी

ROHIT SHARMA
Photo Courtesy: X/BCCI

Rohit Sharma: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या सुपर 8 (Super 8) फेरीत अ गटातील भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) भिडले. उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 92 धावांच्या झंझावाती खेळीत विक्रमांची रास लावली.

या विश्वचषकात आतापर्यंत केवळ एक अर्धशतक केलेल्या रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तिसऱ्या षटकापासून त्याने फटकेबाजीला सुरुवात केली. त्याने केवळ 19 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. हे या विश्वचषकातील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. तसेच, त्याच्या टी20 कारकिर्दीतील देखील ते सर्वात वेगवान अर्धशतक होते. त्याने बाद होण्यापूर्वी केवळ 41 चेंडूत 92 धावांची तुफानी खेळी केली. यामध्ये 7 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता.

रोहितने आपल्या या खेळी दरम्यान पाचवा षटकार मारताना टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 200 षटकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू मार्टिन गप्टिलने 173 षटकार मारले आहेत. याच खेळीदरम्यान  रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19000 धावांचा टप्पा पार केला.

एकाच प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित आता सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 130 षटकार खेचले आहेत. रोहित हा सुरेश रैनानंतर टी20 विश्वचषकात सर्वांचे वैयक्तिक धावसंख्या करणारा फलंदाज बनला. रैनाने 2010 टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 101 धावांची खेळी केलेली.

(Rohit Sharma Records In 92 Runs Inning Against Australia In T20 World Cup 2024)

IND vs AUS| हिटमॅनने स्टार्कच फोडला! पाहा रोहितने मारलेले 6,6,6,6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version