Breaking News

IND vs AUS| हिटमॅनने स्टार्कच फोडला! पाहा रोहितने मारलेले 6,6,6,6

IND vs AUS: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) सुपर 8 च्या महत्त्वपूर्ण सामन्यात समोरासमोर आले. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळालेल्या भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने तुफानी सुरुवात दिली. केवळ 19 चेंडूंमध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याच्यावर जोरदार हल्ला चढवला.

आतापर्यंत स्पर्धेत आपल्या नावानुसार खेळ न दाखवलेल्या रोहितने या सामन्यात मात्र आपले हिटमॅन हे नाव सार्थ केले. दुसऱ्या षटकात विराट कोहली बाद झाल्यानंतर रोहितने तिसऱ्या षटकात आपले गिअर बदलले. मिचेल स्टार्क याने टाकलेल्या या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर त्याने कव्हर्सच्या डोक्यावरून षटकार मारले. यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने चौकार वसूल केला. चौथ्या चेंडूवर पुन्हा एक षटकार मारत त्याने आपला इरादा दाखवून दिला. तर या षटकातील अखेरच्या चेंडूवर षटकातील चौथा षटकार मारून त्याने 29 धावा वसूल केल्या.

रोहित आतापर्यंत या विश्वचषकात डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध तीन वेळा बाद झाला होता. यावेळी मात्र त्याने ही आपली कमजोरी नसल्याचे दाखवून दिले.

रोहितने यादरम्यान आपल्या टी20 कारकिर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केले. तसेच, टी20 आंतरराष्ट्रीय मध्ये 200 षटकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला.

(IND vs AUS Rohit Sharma Hits Starc 4 Sixes)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version