Breaking News

भाऊच कमबॅक झालं! Ruturaj Gaikwad चे दुसऱ्या वनडेत दणदणीत शतक

ruturaj gaikwad
Photo Courtesy: X

Ruturaj Gaikwad Hits Century In Raipur ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्या दरम्यान दुसरा वनडे सामना रायपूर येथे खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासाठी विराट कोहली व ऋतुराज गायकवाड यांनी मोठी भागीदारी रचली. ऋतुराजने तुफान फटकेबाजी करताना आपल्या कारकिर्दीतील पहिले वनडे शतक पूर्ण केले. 

Ruturaj Gaikwad Hits Maiden ODI Century

जवळपास दोन वर्षानंतर भारतीय संघात सामील झालेल्या ऋतुराज याला पहिल्या सामन्यात अपयश आले होते. तो केवळ आठ धावा बनवू शकला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याने दबाव झुगारून दिला. सुरुवातीला वेळ घेतल्यानंतर त्याने 52 चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने धावांचा वेग अधिकच वाढवत 77 चेंडूवर शतकाला गवसणी घातली. बाद होण्यापूर्वी त्याने 83 चेंडूंमध्ये 105 धावा केल्या. यामध्ये 12 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: दे दणका! Virat Kohli चे सलग दुसऱ्या वनडेत शतक, 84 शतकांचा बनला मानकरी

Exit mobile version