Breaking News

Divya Deshmukh Story; केवळ 18 व्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन बनलेली दिव्या देशमुख आहे तरी कोण? जाणून घ्या थोडक्यात

divya deshmukh
Photo Courtesy: X/ASI

Who Is Divya Deshmukh|गांधीनगर येथे पार पडलेल्या जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (World Junior Chess Championship 2024) भारताच्या दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने विजेतेपद पटकावले. त्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली आहे. आपण तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेऊया.

दिव्या देशमुख ही मूळची नागपूर येथील आहे. फक्त अठराव्या वर्षी जागतिक विजेती बनलेल्या दिव्या हिचा या खेळातील प्रवेश हा देखील अत्यंत मजेशीर पद्धतीने झाला. दिव्या हिची मोठी बहीण बॅडमिंटन खेळत. अवघ्या पाच वर्षाच्या दिव्याला देखील तिच्यासोबत खेळायला पाठवण्यात येत असे. मात्र, ती योग्यरीत्या रॅकेट पकडत नव्हती. तसेच, तिचे शॉट्स देखील तितके योग्य नव्हते. एकूणच तिला खेळांबद्दल कमालीची अनास्था होती.

असे असले तरी तिच्या पालकांना वाटत असेल तिने कोणता तरी एक खेळ तिची बहीण जिथे सराव करायची तिथेच खालच्या मजल्यावर बुद्धिबळाचे वर्ग घेतले जात. दोन्ही मुलींचा वेळ एकच असावा म्हणून तिच्या पालकांनी तिला बुद्धिबळ खेळवण्याचा निर्णय घेतला. तिथे ती मास्टर राहुल यांच्याकडून धडे घेत.

दिव्याने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, ती सुरुवातीला बुद्धिबळ वर्गात गेल्यानंतर अक्षरशः झोपत असत. मात्र, कालांतराने तिला या खेळात रुची आली. त्यानंतर ती खेळात पारंगत झाली तसेच तिने अनेक स्पर्धा देखील जिंकल्या.

दिव्या हिने 2022 मध्ये भारतात देशांतर्गत महिला बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकण्यात यश मिळवले. तसेच, 2023 मध्ये ती आशियाई विजेती बनली. त्यानंतर आता थेट जागतिक विजेती बनत तिने आपल्या यशाचा आलेख चढता ठेवला आहे.

(Short Story Of 2024 World Junior Chess Champion Divya Deshmukh)

BREAKING| नागपूरची दिव्या देशमुख बनली विश्वविजेती! 18 व्या वर्षीच जिंकली World Junior Chess Championship 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version