Breaking News

हे खरं वर्चस्व! 2023 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Shubman Gill चा एकतर्फी दबदबा, वाचा सगळे रेकॉर्ड

shubman gill
Photo Courtesy: X

Shubman Gill Dominance In Cricket Since 2023: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) त्यांच्या दरम्यान एजबॅस्टन (Edgbaston Test) येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. भारतीय कर्णधार शुबमन गिल याने या सामन्यात एक ऐतिहासिक द्विशतक झळकावले. यासोबतच त्याने अनेक विक्रमही आपल्या नावे केले. तसेच 2023 पासून त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. 

Shubman Gill Dominance In international Cricket Since 2023

हेडिंग्ले येथे झालेल्या पहिल्या कसोटीत त्याने शतकी खेळी केली होती. दुसऱ्या कसोटीतही त्याने आपला हाच फॉर्म कायम ठेवला. त्याने पहिल्या दिवशी शतक पूर्ण केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात द्विशतक झळकावले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक होते. (Latest Cricket News)

गिल हा भारताच्या वनडे व कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे‌. तसेच, टी20 संघात देखील त्याचा समावेश होत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2023 पासून विचार करायचा झाल्यास फलंदाजीत त्याने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्याने 2023 पासून सर्वाधिक धावा बनवल्या आहेत. तर, कमीत कमी 3500 धावा बनवणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याची सरासरी सर्वाधिक आहे. या काळात त्याने सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक अर्धशतके देखील ठोकली आहेत. तसेच, सर्वाधिक बाउंड्री देखील त्यानेच मारलेल्या दिसतात.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Shubman Gill 200: वाह गिल वाह! एजबॅस्टनमध्ये इंग्लंडला दिला द्विशतकी दणका

कॅप्टन Shubman Gill चा इंग्लंडवर घणाघात! सलग दुसऱ्या कसोटीत मारली सेंच्युरी

 

Exit mobile version