Breaking News

प्रो कबड्डीला टक्कर द्यायला आली नवी लीग! दिग्गज खेळाडूंनी सुरू केली IPKL, 8 शहरांचे संघ

ipkl
Photo Courtesy; X

Indian Premier Kabaddi League: जगातील सर्वात मोठी व्यवसायिक कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) या स्पर्धेला आव्हान देण्यासाठी नवी लीग सुरू होत आहे. सोनी स्पोर्ट्स यांनी इंडियन प्रीमियर कबड्डी लीग (Indian Premier Kabaddi League) म्हणजेच आयपीकेएल (IPKL) ची घोषणा केली आहे. स्पर्धेचा पहिला हंगाम 4 ऑक्टोबर पासून खेळला जाईल.

सोनी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन केले जाणार देशभरातील आठ शहरांचे संघ यामध्ये सहभागी होतील. दिल्ली, मुंबई, पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, बेंगलोर व राजस्थान हे संघ असतील. भारताचा माजी अष्टपैलू मनजित छिल्लर (Manjeet Chhillar) हा स्पर्धेचा ब्रँड अँबेसिडर असेल.

या लीगमध्ये भारताचे अनेक माजी कबड्डीपटू सामील होऊ शकतात. अजय कुमार, संदीप कंडोला व‌ सुनील नरवाल यांनी स्पर्धेसाठी आपली उपलब्धता कळवली आहे. याव्यतिरिक्त प्रो कबड्डी लिलावात डावलल्या गेलेल्या अनुभवी खेळाडूंना देखील स्थान मिळण्याची शक्यता आहे.‌‌ यासोबतच अनेक विदेशी खेळाडू देखील लीगमध्ये सामील होणार आहेत. स्पर्धेपूर्वी खेळाडूंची निवड चाचणी होईल. त्यातून युवा खेळाडूंसह संघबांधणी होणार आहे.

(Sony Sports Starts New Kabaddi League IPKL)

या दिवशी सुरू होणार PKL 2024, तारखांसह ठिकाणेही जाहीर, पुण्याचे सामने…

Exit mobile version