कोण हा Raghu Sharma? वय 33, कृष्णभक्त, शेन वॉर्न आणि बरंच काही

raghu sharma
Photo Courtesy: X

Story Of Raghu Sharma: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSKvMI) या आयपीएलमधील सर्वात हाय व्होल्टेज सामन्यात मुंबईसाठी एका नव्या खेळाडूने पदार्पण केले. हा खेळाडू नवोदित नसला तरी, त्याला या पदार्पणासाठी वयाच्या 33 व्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागली. त्याचे नाव रघु शर्मा.

Story Of MI Spinner Raghu Sharma

पंजाबच्या जालंधरमध्ये जन्मलेल्या रघुच्या किंवा नातेवाईकांत कोणीही क्रिकेट खेळले नाही. त्याच्या घरात सारे डॉक्टर आणि इंजिनिअर. स्वतः रघुलादेखील क्रिकेटमध्ये फारसा रस नव्हता. त्याने 2011 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला ऍडमिशन देखील घेतले होते. नेमके त्याच वेळी भारतीय क्रिकेट संघाने 28 वर्षानंतर वनडे विश्वचषक जिंकला. इथेच ठिणगी पडली आणि रघु याने क्रिकेटपटू होण्याचा निर्णय घेतला. मात्र, इथे एक गोष्ट त्याच्या विरोधात जात होती ती म्हणजे त्याचं वजन. स्वतः रघु सांगतो त्यावेळी माझं वजन 120 किलोच्या आसपास होते. परंतु, क्रिकेटपटू होण्याचे ठरवलेल्या रघुने कष्ट देखील करण्याचा निश्चय घेतला.

रघुच्या अशा शरीरयष्टीमूळे प्रशिक्षक देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करत. त्यानंतर त्याने वजन कमी करण्याचे शिवधनुष्य उचलले. रघु 40 डिग्रीपेक्षा जास्तच्या उन्हात भर दुपारी धावायचा. न थकता दोन तास सराव करायचा. या कष्टाचे फळ त्याला मिळाले आणि पुढील सहा महिन्यात त्यांनी जवळपास 35 किलो वजन कमी केले. मध्यमगती गोलंदाजी करणाऱ्या रघुला त्यानंतर जिल्हास्तरावर संधी मिळाली.

एके दिवशी रघु गोलंदाजी करत असताना हॅमस्ट्रिंगने डोके वर काढले. त्यामुळे त्याने दोन पावले चालत येत, लेगकटर टाकले. तिथे उपस्थित असलेले जालंधर क्रिकेट संघटनेचे प्रशिक्षक व माजी भारतीय क्रिकेटपटू मदनलाल यांनी त्याच्यातील फिरकी गोलंदाजाचे गुण ओळखले. त्यांनी त्याला तिथेच फिरकी गोलंदाज होण्याचा सल्ला दिला. हा सल्ला मानत त्याने लेग स्पिनर म्हणून नवी सुरुवात केली.

रघुने लेगस्पिनर बनल्यानंतर एकलव्याप्रमाणे आपला गुरु निवडला आणि तो गुरु होता ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान फिरकीपटू शेन वॉर्न. युट्युबवर वॉर्नचे कित्येक व्हिडिओ पाहून तो गोलंदाजी शिकला. स्लाइडर, गुगली हे चेंडू वॉर्नचे व्हिडिओ पाहूनच शिकल्याचे तो कबूल करतो. पुढच्या काळात भारताचे माजी फिरकीपटू एम व्यंकटरमण व राहुल शर्मा त्याला मेंटर म्हणून मिळाले. जे आज देखील त्याच्यासोबत आहेत.

हे देखील वाचा: नाशिककर Ramakrishna Ghosh ची IPL 2026 रणांगणात एन्ट्री! अफाट मेहनत आणि CSK चा विश्वास…

सुरुवातीच्या काळात रघुला त्याच्या घरच्यांचा तितका पाठिंबा नव्हता. तसेच त्याचे वय देखील पुढे गेल्याने वयोगट क्रिकेट खेळण्याची संधी नव्हती. स्थानिक स्तरावर चांगली कामगिरी झाल्यानंतर घरचे थोडेसे सकारात्मक झाले. वडिलांनी त्याला समजावले की, “क्रिकेट खेळू शकतोस मात्र शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नको” वडिलांचा हा सल्ला त्याने ऐकला आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर देखील बनला.

रघुच्या आयुष्यात 2014 मध्ये मोठा बदल झाला. तो आपल्या कुटुंबासह उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी गेला होता. तेथील भक्तिमय वातावरण पाहून तो भारावला आणि थेट वैष्णव पंथातच सामील झाला. वैष्णव पंथात कांदा व लसूण खाण्यास मनाई असते. खेळाडू असल्याने या गोष्टीवर लक्ष ठेवणे अवघड बनते. रघुने आपल्या प्रशिक्षकांना व संघाला याबाबत कल्पना दिली होती. कित्येकदा प्रशिक्षकांशी त्याचा वाद होईल. प्रशिक्षक त्याला रागवत. मात्र, शक्य असेल तेव्हा शेफला सांगून आणि शक्य नसेल तर स्वतः हाताने बनवून तो बिना कांदा व लसणाचे जेवण बनवत. कठीण काळातही तो आपल्या तत्वांशी अगदी प्रामाणिक राहिला.

 

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

 

 

Exit mobile version