Breaking News

आता पुढच्या वर्षी कप नमदे! कहाणी RCB च्या 2024 सिझनची

rcb
Photo Courtesy: X/Johns

Story Of RCB IPL 2024: अखेर व्हायचे ते झालेच! स्टार स्पोर्ट्सने आणि आरसीबीच्या फॅन्सने कितीही Build Up केला तरी, आरसीबी पुन्हा एकदा आयपीएलच्या चमचमत्या ट्रॉफीपासून दोन हात दूरच राहिली. मागील चार दिवसांपासन यंदा ‘ई साल कप नमदू’ होणारच असं RCB फॅन्सना वाटत होतं. किंबहुना आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये पण हाच माहौल होता. मात्र, सालाबादप्रमाणे संघाने चोक होण्याची परंपरा राखली आणि तुषार देशपांडेने इंस्टाग्राम स्टोरीत मेंशन केल्याप्रमाणे संघाला बंगळूरु रेल्वे स्टेशनचे तिकीट बुक कराव लागल.

तसं पाहायला गेलं तर आरसीबी अगदी पहिल्या सीजनपासून विजेतेपदासाठी दावेदार राहिला. आजवर कितीतरी दिग्गज त्यांच्यासाठी खेळून गेले. मात्र, ट्रॉफी लांबच राहिली. यंदा का माहित नाही मात्र आरसीबी फॅन्स असो, किंवा थोडे फार क्रिकेट जाणणाऱ्यांना वाटत होतं ते नक्की काहीतरी करतील.‌ तसं कोणी काही म्हणू यावेळी देखील टीम उन्नीसच होती. तरी आशे पुढे सगळ्या गोष्टी फोल.

ऑक्शनमध्ये फास्ट बॉलर्सवर बक्कळ पैसा ओतला गेला. अल्झारी, फर्ग्युसन‌ आणि दयाल बॉलिंगला स्ट्रॉंग (?) बनवण्यासाठी आणले होते. खरा दाव खेळला गेला कॅमेरून ग्रीनच्या रूपाने. ट्रेडिंगमध्ये त्याला आरसीबीने तब्बल साडे सतरा कोटींना आपल्याकडे घेतले. नव रक्त आहे काहीतरी भारी करेल अशीच अपेक्षा त्याच्याकडूनही.

सिझन सुरू झाला आणि आरसीबीने आपला रंग दाखवला. पहिली मॅच जिंकले अस तर क्वचितच घडत. सीएसकेविरुद्ध हरले. दुसऱ्या मॅचला पंजाबला हरवून बोहनी केली. त्यानंतर जे काही घडलं ते आरसीबीने स्वप्नातही पाहिलं नसेल. सलग सहा मॅच विजय दूर राहिला. विराट एकटाच खेळत होता. कधीमधी DK आपला क्लास दाखवायचा. एखादी इनिंग दुसऱ्या कोण्या बॅटरकडून आली.‌ मात्र कौतुक करायलाही बॉलर्सची पाटी पोरी राहिली. आठव्या लीग मॅचनंतर आरसीबीच्या नावापुढे होते 7 पराभव आणि 1 विजय.

21 एप्रिलला केकेआरविरुद्ध 1 रनने हरल्यावर आरसीबी चोकर्स नाव सार्थ करतेय असंच वाटू लागेलल. सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झालं. माजी खेळाडूंनी Analysis च्या नावाखाली शालजोडीतून मारले.‌ आपला सीजन संपलाय, आता पुढच्या वर्षीची तयारी करू, असे खुद्द आरसीबी फॅन्सच म्हणत होते. कारण प्ले ऑफ्समध्ये जाण्यासाठी त्यांचा चान्स होता फक्त 1 टक्का!

नवव्या मॅचमध्ये सीझनची Team To Beat असलेल्या सनरायझर्स हैदराबादला चक्क 35 रन्सने हरवून त्यांनी आता आपण इज्जतीसाठी खेळत असल्याचे दाखवून दिले. पुढची मॅच गुजरातविरुद्ध झाली आणि आधीपासूनच जगभरात नाव कमावत असलेल्या, मात्र आयपीएलमध्ये मोठा धमाका करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या विल जॅक्स याने गुजरातची बॉलिंग अशी काही फोडून काढली की 201 रन्स चेस करायला फक्त 16 ओव्हर लागल्या. आठवडाभराने पुन्हा एकदा गुजरातचा बँड वाजवला आणि पंजाबला हरवून, काहीतरी Exciting होणारेय याची Hint आरसीबीने दिली. दिल्लीविरुद्ध आणखी एक Comfortable Win मिळवून त्यांनी थेट प्ले ऑफ्ससाठी दावेदारी ठोकली. सीएसकेविरुद्ध शेवटची लीग मॅच. फक्त जिंकून चालणार नव्हतं तर Winning Margin 18 रन्सच पाहिजे होतं.

Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score । (kridacafe.com)

सीएसके मॅच हरत होती मात्र क्वालिफिकेशनच्या जवळ आलेली. लास्ट ओव्हरमध्ये सीएसकेला क्वालिफाय होण्यासाठी रन्स हव्या होत्या 17, बॉल होता यश दयालच्या हातात (हा तोच यश ज्याला रिंकूने 5 सिक्स मारलेले) आणि स्ट्राइकवर खुद्द एमएस धोनी. पहिल्याच बॉलवर धोनीने 110 मीटरचा सिक्स मारला आणि सगळ्यांच्या तोंडून निघाले, “केली माती दयालने” पण दयाल आणि आरसीबीच्या नशिबात वेगळच काही लिहिलं होतं. पुढच्या बॉलवर धोनी आउट झाला. नंतरच्या चार बॉलमध्ये फक्त एक रन निघाली आणि RCB Into The PlayOffs! एक अविश्वासनीय कमबॅक आरसीबीने करून दाखवला होता.

आरसीबीच्या कमबॅकमध्ये निश्चितच सर्वात मोठा रोल राहिला विराट कोहलीचा. विल जॅक्स, रजत पाटीदार आणि कॅप्टन प्लेसिस यांनी त्याला तितकीच खंबीर साथ दिली. यश दयाल आणि लॉकी फर्ग्युसनला टप्पा सापडलेला तर कर्ण शर्माने आजवरचा अनुभव झोकून देत आपले 100 टक्के योगदान दिले. स्वप्निल सिंग लकी चार्म ठरला. मात्र, हे फक्त लीग स्टेजपर्यंत.

एलिमिनेटरचा माहौल पुन्हा एकदा आरसीबीसाठी बनवला गेला आणि राजस्थानने चुपचाप त्यांचा कार्यक्रम केला. एखाद दुसरी Moment सोडली तर आरसीबीच्या हाताला काहीच लागू दिले नाही. जे नेहमी घडत आलं होतं तसंच प्ले ऑफ्समध्ये पहिले पाढे पंचावन्न. सलग सतरा वर्ष ‘इ साल कप नमदे’ म्हणत आलेले आरसीबी फॅन्स आता म्हणत होते ‘बघू आता पुढच्या वर्षी कप नमदे’!

पुढच्या वर्षी कदाचित मेगा ऑशन होईल. आरसीबीला नव्याने टीम बांधावी लागेल. बाकी कोणासाठी नाही पण विराट कोहली आणि जगातील सर्वात लॉयल फॅन्ससाठी आरसीबीने ट्रॉफी उचलावी असं प्रत्येक क्रिकेटप्रेमीला वाटतंच. कारण सगळेच त्यांच्या तोंडून स्मृती मंधानासारखे ‘ इ साल कप नमदू’ ऐकायला तरसले आहेत.

(Story Of RCB IPL 2024 Season)

Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score । (kridacafe.com)

21 comments

  1. Good day! Do you use Twitter? I’d like to follow you if that would be okay. I’m undoubtedly enjoying your blog and look forward to new posts.

  2. I know this if off topic but I’m looking into starting my own blog and was wondering what all is needed to get set up? I’m assuming having a blog like yours would cost a pretty penny? I’m not very internet smart so I’m not 100 sure. Any recommendations or advice would be greatly appreciated. Thanks

  3. As a Newbie, I am permanently browsing online for articles that can aid me. Thank you

  4. Great web site. A lot of helpful info here. I am sending it to a few pals ans also sharing in delicious. And naturally, thanks in your sweat!

  5. Perfect piece of work you have done, this site is really cool with excellent information.

  6. naturally like your web site however you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very bothersome to tell the truth on the other hand I will surely come again again.

  7. I do not even understand how I ended up here, but I assumed this publish used to be great

  8. This is my first time pay a quick visit at here and i am really happy to read everthing at one place

  9. I really like reading through a post that can make men and women think. Also, thank you for allowing me to comment!

  10. Pretty! This has been a really wonderful post. Many thanks for providing these details.

  11. Some really interesting info , well written and broadly speaking user genial.

  12. You should participate in a contest for one of the best blogs on the web. I’ll recommend this web site!

  13. Wow! This can be one particular of the most helpful blogs We have ever arrive across on this subject. Basically Excellent. I’m also an expert in this topic therefore I can understand your effort.

  14. Wow! This can be one particular of the most useful blogs We have ever arrive across on this subject. Actually Excellent. I’m also an expert in this topic therefore I can understand your effort.

  15. Have you ever considered publishing an e-book or guest authoring on other blogs? I have a blog based upon on the same information you discuss and would really like to have you share some stories/information. I know my viewers would appreciate your work. If you are even remotely interested, feel free to shoot me an email.

  16. Howdy very cool website!! Man .. Beautiful .. Amazing .. I will bookmark your web site and take the feeds also?KI’m glad to search out a lot of useful info right here in the post, we’d like work out extra techniques on this regard, thanks for sharing. . . . . .

  17. This design is spectacular! You certainly know how to keep a reader amused. Between your wit and your videos, I was almost moved to start my own blog (well, almost…HaHa!) Fantastic job. I really enjoyed what you had to say, and more than that, how you presented it. Too cool!

  18. You have brought up a very superb details , appreciate it for the post.

  19. I think this web site has some rattling superb info for everyone. “Dealing with network executives is like being nibbled to death by ducks.” by Eric Sevareid.

  20. Great site. A lot of helpful info here. I?¦m sending it to several pals ans also sharing in delicious. And of course, thanks for your sweat!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version