Breaking News

IPL 2024 | विराटचा भीमपराक्रम! बनला आयपीएल इतिहासात ‘असा’ पराक्रम करणारा एकमेव पठ्ठ्या

IPL 2024: इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेचा एलिमिनेटर सामना बुधवारी (दि. 22 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. हा सामना अहमदाबादमध्ये खेळला गेला. या सामन्यात आरसीबी संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली याने फक्त 33 धावा केल्या. मात्र, या छोटेखानी खेळीतही विराटने भीमपराक्रम केला. विराट हा आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.

झाले असे की, या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) उतरले होते. फाफ फक्त 17 धावा करून बाद झाला. त्यानंतर विराटने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याला फार काही करता आले नाही. युझवेंद्र चहल टाकत असलेल्या आठव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विराट डी फेरेरा याच्या हातून झेलबाद झाला. यावेळी विराट 24 चेंडूत 33 धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याने 1 षटकार आणि 3 चौकारही मारले.

विराटचा भीमपराक्रम
विराटने 33 धावांची खेळी केली असली, तरीही त्याने या खेळीद्वारे जबरदस्त विक्रम आपल्या नावावर केला. विराट हा आयपीएल (IPL) इतिहासात 8000 (Virat Kohli 8000 Runs) धावांचा टप्पा पार करणारा एकमेव खेळाडू बनला. विराटने हा पराक्रम अवघ्या 252 सामन्यांमध्ये केला आहे.

विराटची आयपीएल कारकीर्द
विराटच्या आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 252 सामने खेळताना 38.67च्या सरासरीने आणि 131.97च्या स्ट्राईक रेटने 8004 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 8 शतके आणि 55 अर्धशतके निघाली आहेत.

आयपीएल 2024मधील विराटची कामगिरी
विराटने आयपीएल 2024 (IPL 2024) हंगामात आतापर्यंत 15 सामने खेळले. यादरम्यान त्याने 61.75च्या सरासरीने आणि 154.70च्या स्ट्राईक रेटने 741 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 1 शतक आणि 5 अर्धशतके निघाली आहेत. नाबाद 113 ही त्याची चालू हंगामातील सर्वोच्च धावसंख्या आहे.

हेही वाचा-
“मला माफ करा” Shane Watson ने जोडले RCB च्या चाहत्यांसमोर हात, 2016 आयपीएल फायनल…
Team India New Head Coach: ‘या’ चौघांपैकी एक असणार टीम इंडियाचा पुढचा द्रोणाचार्य, BCCI नेच धरला आग्रह
Virat Kohli च्या जीवाला धोका? RCB चे सराव सत्र रद्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version