Breaking News

USA Beat Pakistan| पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव! USA ने केला टी20 World Cup 2024 मधील सर्वात मोठा अपसेट, सुपर ओव्हरमध्ये पाक साफ

USA BEAT PAKISTAN
Photo Courtesy: X/ICC

USA Beat Pakistan In T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मधील 11 वा सामना यजमान युएसए आणि पाकिस्तान (USAvPAK) असा खेळला गेला. ग्रॅंड प्रायरे स्टेडियम (Grand Praire Stadium) डल्लास (Dallas) येथे झालेल्या या सामन्यात युएसए क्रिकेट संघाने (USA Cricket Team) ने इतिहास रचला. मोनांक पटेल (Monak Patel) याच्या नेतृत्वातील युएसएने पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये (Super Over) पराभव केला. हा पाकिस्तानचा टी20 इतिहासातील सर्वात लाजिरवाणा पराभव मानला जात आहे.

डल्लास येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. मात्र, सौरभ नेत्रावळकर (Saurabh Netratvalkar) व इतर गोलंदाजांनी पाकिस्तानला चांगले जखडून ठेवले. पाकिस्तानने आपले दोन्ही सलामीवीर फक्त 12 धावांमध्ये गमावले. फखर जमान‌ही फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. कर्णधार बाबर आझमने पहिल्या 22 चेंडूंमध्ये केवळ 7 धावा काढल्या होत्या. त्यानंतर शादाब खान याने काही मोठे फटके खेळत धावगती वाढवली. मात्र, तो देखील 40 धावा करून तंबूत परतला. बाबरनेही 43 चेंडूत 44 धावा केल्या. अखेर शाहीन आफ्रिदीने नाबाद 23 धावा करत संघाला 159 पर्यंत नेले. युएसएसाठी फिरकीपटू केन्जिगे याने 3 तर सौरभ नेत्रावळकर याने 2 बळी टिपले.

या धावांचा पाठलाग करताना अमेरिकेला स्टीव्हन टेलर व मोनांक पटेल यांनी 40 धावांची सलामी दिली. टेलर बाद झाल्यावर मोनांकने गौससोबत डाव पुढे नेला. दोघांनी 70 धावांची भागीदारी केली. गौसने 35 व मोनांक पटेल याने (Monank Patel Fifty) 50 धावा केल्या. पटेल बाद झाला तेव्हा युएसए संघाला 47 चेंडूंमध्ये 49 धावांची गरज होती. मात्र, त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत जोन्स व नितीश कुमार यांना रोखले. पंप अखेरच्या षटकात 15 धावांची आवश्यकता असताना आधी जोन्स याने एक षटकार व अखेरचा चेंडूवर नितीश कुमार यांनी चौकार ठोकत सामना सुपर ओव्हरमध्ये नेला.

सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानकडून अनुभवी मोहम्मद आमिर याने अत्यंत स्वैर गोलंदाजी केली. त्याने चार वाईड चेंडू टाकले. त्यामुळे हरमीत व जोन्स यांनी 18 धावा वसूल केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इफ्तिखार अहमद याला तिसऱ्या चेंडूवर बाद करत सौरभ नेत्रावळकर याने संघाला मोठे यश मिळवून दिले. अखेरच्या चेंडूवर पुन्हा एकदा सुपर ओव्हर होण्यासाठी सहा धावांची गरज असताना नेत्रावळकर याने फक्त एक धाव देत संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. अर्धशतक करणारा कर्णधार मोनांक पटेल सामनावीर ठरला.

(T20 World Cup 2024 USA Beat Pakistan In Super Over USA Captain Monank Patel Hits Fifty)

5 comments

  1. With havin so much written content do you ever run into any problems of plagorism or copyright infringement? My blog has a lot of unique content I’ve either authored myself or outsourced but it looks like a lot of it is popping it up all over the internet without my agreement. Do you know any methods to help reduce content from being stolen? I’d really appreciate it.

  2. Really clean site, thanks for this post.

  3. Awsome site! I am loving it!! Will be back later to read some more. I am taking your feeds also

  4. Some genuinely interesting info , well written and broadly speaking user genial.

  5. What i do not understood is if truth be told how you are no longer actually a lot more well-favored than you might be right now. You are very intelligent. You understand therefore considerably in relation to this matter, made me personally consider it from so many varied angles. Its like men and women aren’t involved except it is something to do with Lady gaga! Your individual stuffs excellent. All the time maintain it up!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version