Breaking News

सुपर 8 मध्ये एन्ट्री करत USA ने रचला इतिहास! पाकिस्तानची T20 World Cup 2024 मधून घरवापसी

t20 world cup 2024
Photo Courtesy: X/ICC

Pakistan Out Of T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये शुक्रवारी (14 जून) यूएसएविरुद्ध आयर्लंड (USA vs IRE) असा सामना खेळला जाणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. त्यामुळे युएसए संघ सुपर 8 (USA Entered In T20 World Cup 2024 Super 8) मध्ये प्रवेश करणारा अ गटातील दुसरा संघ बनला. तर, मागील विश्वचषकाचे उपविजेते पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर झाले (Pakistan Out Of T20 World Cup 2024).

फ्लोरिडा येथे होणाऱ्या या सामन्यात आयर्लंड संघाने विजय मिळवल्यास पाकिस्तान संघाला सुपर 8 ची संधी राहणार होती. मात्र, निर्धारित वेळेत पाऊस व खराब मैदानामुळे सामना सुरूच झाला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला गेला. या एका गुणासह युएसए संघाचे पाच गुण झाले. त्यांनी कॅनडा व पाकिस्तान यांना पराभूत करत आधीच चार गुण कमावले होते.

दुसरीकडे आता पाकिस्तान आपला अखेरचा सामना आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात त्यांनी विजय मिळवला तरी ते चार गुणांपर्यंतच पोहोचतील. त्यामुळे पाकिस्तानला आता पुढील फेरीत चाल करता येणार नाही. दुसरीकडेच सुपर 8 मध्ये प्रवेश केल्याने युएसए 2026 टी20 विश्वचषकासाठी देखील पात्र ठरला आहे.

(T20 World Cup 2024 USA Into Super 8 Pakistan Out)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version