Breaking News

Wiaan Mulder 300: दक्षिण आफ्रिकेचा नवा कर्णधार बनला ‘ट्रिपल सेंच्युरीअन’, 148 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात…

wiaan mulder 300
Photo Courtesy: X

Wiaan Mulder 300 Against Zimbabwe: दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे (SA vs ZIM) यांच्या दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. त्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व करणारा विआन मल्डर याने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने त्रिशतक झळकावले. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला कर्णधार बनला. 

Wiaan Mulder 300 Against Zimbabwe In Test

झिम्बाब्वेविरूद्धच्या या कसोटीच्या पहिल्या दिवशीच दक्षिण आफ्रिकेने मोठी धावसंख्या उभी केली होती. संघाचे नेतृत्व करत असलेल्या मल्डर याने पहिल्या दिवशीच 265 अशी मोठी मजल मारलेली. त्यासोबत तो कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम बनवण्यात यशस्वी ठरलेला. त्याने विराट कोहलीच्या 256 धावांना मागे टाकले होते.

दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातच त्याने आक्रमक फलंदाजी केली. त्याने लवकरच आपले त्रिशतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेसाठी त्रिशतक झळकावणारा तो हाशिम आमलानंतर केवळ दुसरा फलंदाज बनला. तर, सध्या कार्यरत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये केवळ भारताचा करूण नायर व इंग्लंडचा हॅरी ब्रूक यांनीच त्रिशतक ठोकले आहे.

त्याने आपली खेळी अशीच पुढे नेत पहिल्या सत्राच्या अखेरीपर्यंत 367 धावा बनवल्या. दुसऱ्या सत्रात त्याच्याकडे ब्रायन लाराचा 400 धावांचा विक्रम मोडण्याची संधी होती. मात्र, त्याने आपला डाव घोषित केला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 626 धावा केल्या.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ENG vs IND: Edgbaston Test मध्ये टीम इंडियाची विजयाची वारी, 58 वर्षांनी मारलं बर्मिंगहॅमच मैदान

Exit mobile version