Breaking News

Will Pucovski: क्रिकेटविश्वात चाललंय तरी काय? ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अवघ्या 26 व्या वर्षी निवृत्त, धक्कादायक कारण समोर

will pucovski
Photo Courtesy: X

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू निवृत्ती जाहीर करत आहेत. गुरुवारी (29 ऑगस्ट) यामध्ये आणखी एका नावाची भर पडली. ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर विल पुकोवस्की (Will Pucovski) याने आपल्या तब्येतीचे कारण देत, केवळ 26 व्या वर्षी क्रिकेटला अलविदा केला. त्याच्याकडे ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे भविष्य म्हणून पाहिले जात होते.

पुकोवस्की याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा बनवल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा पुढील कसोटी सलामीवीर म्हणून त्याच्या नावाची चर्चा होती. भारताविरुद्ध 2019 मध्ये सिडनी येथे त्याने आपला एकमेव कसोटी सामना खेळला. यामध्ये त्याने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर तो सातत्याने दुखापतग्रस्त राहिला. त्याला अनेक वेळा डोक्याला चेंडू लागल्याने, कंकशनचा त्रास झाला. यावर्षी मार्च महिन्यात लागलेल्या अशाच प्रकारच्या चेंडूमुळे तो भयभीत झालेला. त्यानंतर त्याला डॉक्टरांनी क्रिकेट न खेळण्याचा सल्ला दिलेला.

मागील काही दिवसात अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी निवृत्ती जाहीर केली आहे. यामध्ये भारताचा शिखर धवन‌ हे सर्वात मोठे नाव दिसून येते. यासोबतच बुधवारी (28 ऑगस्ट) इंग्लंडचा सलामीवीर डेविड मलान व वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शेनॉन गॅब्रिएल यांनी देखील निवृत्ती जाहीर केली होती.

(Will Pucovski Annouced Early Retirement From Cricket)

शॉकिंग! वेस्ट इंडिजच्या 200 हून अधिक विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची तडकाफडकी निवृत्ती, म्हणाला…

Exit mobile version