Breaking News

WWE विश्व शोकसागरात! दिग्गज Hulk Hogan चे दुःखद निधन

hulk hogan
Photo Courtesy: X

Former WWE Superstar Hulk Hogan Passed Away: जगभरातील डब्लूडब्लूई चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर येत आहे. माजी डब्लूडब्लूई सुपरस्टार व दिग्गज हल्क होगन यांचे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. कार्डिअक अरेस्टमूळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले. डब्लूडब्लूईने त्यांच्या निधनाची पुष्टी केली.

WWE Legend Hulk Hogan Passed Away

डब्लूडब्लूई खेळाला नवी ओळख देणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी हल्क एक होते. त्यांनी 1977 मध्ये व्यावसायिक रेसलिंगमध्ये पदार्पण केले होते. साडेसहा फुटांपेक्षा जास्त उंची व बलदंड शरीरासोबतच अनोख्या मिशीमुळे त्यांची विशेष ओळख होती. आपल्या कारकिर्दीत सहा वेळा त्यांनी डब्लूडब्लूई चॅम्पियन पुरस्कार मिळवलेला. त्यांना 2005 व 2021 अशा दोन वेळा डब्लूडब्लूई हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केले गेलेले. यासोबतच त्यांनी अनेक हॉलीवुड चित्रपटांमध्ये काम केलेले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: तूच खरा लढवय्या! फ्रॅक्चर असूनही देशासाठी मैदानात उतरला Rishabh Pant, पाहा व्हिडिओ

Exit mobile version