Breaking News

Yashasvi Jaiswal: इंग्लंडमध्येही जयस्वाल ‘यशस्वी’! हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या दिवशीच झळकावले शतक, भारत 210-2

yashasvi jaiswal
Photo Courtesy:X

Yashasvi Jaiswal Century In Headingley Test: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्यातील पहिल्या हेडिंग्ले कसोटीच्या दुसऱ्या सत्रावर भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने शानदार नाबाद शतक झळकावत सर्वाधिक योगदान दिले. चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा भारताने 2 बाद 210 धावा केल्या आहेत.

Yashasvi Jaiswal Century In Headingley Test

दुसऱ्या सूत्राचा खेळ सुरू झाला तेव्हा भारतीय संघाने संथ सुरुवात केली. जयस्वाल याने यादरम्यान आपले अर्धशतक पूर्ण केले. जयस्वाल व प्रथमच कसोटी कर्णधारपद भूषवत असलेला शुबमन गिल यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. दोघांनी खराब चेंडूंचा समाचार घेत धावा सुरू ठेवल्या. गिलने आपला चांगला फॉर्म कायम राखत अर्धशतकाला गवसणी घातली. दोघांनी शतकी भागीदारी करत, संघाला 200 ची मजल मारून दिली.

दुसऱ्या सत्राचा खेळ समाप्तीकडे येत असताना जयस्वाल याच्या हाताला दुखापत झाली. मात्र, त्यानंतर ही त्याने मैदानावर उभे राहण्याचा निर्णय घेतला. दोन खणखणीत चौकार मारल्यानंतर एकेरी धाव घेत त्याने आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक ठरले. शतकानंतर त्याला एक जीवदान मिळाले. दुसऱ्या सत्राचा खेळ संपला तेव्हा भारताने दोन बाद 210 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे भारताचा एकही बळी या सत्रात गेला नाही. जयस्वाल नाबाद 100 तर गिल नाबाद 58 धावा करून खेळत आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ENG vs IND: टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याचा आज शुभारंभ, वाचा पहिल्या कसोटीबाबत सर्वकाही

टेस्ट कॅप नंबर 317! Sai Sudarshan चे कसोटी पदार्पण, अशी राहिली आजवरची कारकीर्द

ENG vs IND: Headingley Test चा पहिला सेशन टीम इंडियाच्या नावे, यशस्वी-राहुलची 91 ची ओपनिंग

Exit mobile version