Breaking News

ZIM vs IND: भारताचे नवे टी20 पर्व आज झिम्बाब्वेत होणार सुरू! जाणून घ्या पहिल्या टी20 बद्दल सर्व

zim vs ind
Photo Courtesy: X/BCCI

ZIM vs IND: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) विजयानंतर भारतीय संघ प्रथमच मैदानात दिसणार आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा शुबमन गिल (Shubman Gill) याच्या नेतृत्वात शनिवारपासून (6 जुलै) भारतीय संघ झिम्बाब्वेविरूद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळेल.

टी20 विश्वचषकानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे भविष्यात या जागा भराव्या लागणार आहेत.

झिम्बाब्वे दौऱ्यातील हा पहिला सामना शनिवारी हरारे येथे होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 4.30 वाजता हा सामना सुरू होईल. भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होईल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

कर्णधार शुबमन गिल व अभिषेक शर्मा या सामन्यात सलामी देतील. तर ऋतुराज गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर खेळेल, हे संघ व्यवस्थापनाकडून कळविण्यात आले आहे. यासोबतच रियान पराग व ध्रुव जुरेल यांना देखील पदार्पणाची संधी मिळू शकते. रिंकू सिंग यांच्यावर देखील सर्वांची नजर असेल. तसेच गोलंदाजीत वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, रवी बिश्नोई, खलील व आवेश खान सुरुवात करू शकतात.‌

टी20 विश्वचषकासाठी पात्र न ठरल्याने झिम्बाब्वे संघ निराश होता. मात्र, आता ते नवी सुरुवात करताना दिसते. कर्णधार सिकंदर रझा, जोनाथन कॅम्पबेल व टेंडाई चटारा या अनुभवी खेळाडूंवर झिम्बाब्वेची मदार असेल. इनोसंट काया, वेलिंग्टन मासकात्झा, ल्युक जॉंगवे व ब्लेसिंग मुझुरबानी यांच्यावर विशेष नजर असणार आहे.

(ZIM vs IND First T20I Shubman Gill Lead First Time India)

Exit mobile version