Breaking News

पॅरिस ऑलिंपिक्स 2024: मेडलचे 15 दावेदार| Amit Panghal टोकियोत मेडलचे स्वप्न पूर्ण करणार? 16 वर्षांनी रिंगमध्ये फडकणार तिरंगा?

AMIT PANGHAL
Photo Courtesy: X

Amit Panghal And Antim Panghal In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 साठी क्रीडा कॅफेने सुरू केलेल्या मेडलचे 15 दावेदार या  मालिकेतील पुढील दावेदार आहेत बॉक्सर अमित पंघल (Amit Panghal).

(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Amit Panghal)

ऑलिंपिक्ससाठी भारताचे 117 खेळाडूंचे मोठे पथक पॅरिसमध्ये दाखल झाले आहे‌. भारतीय पथकाकडून यावेळी सर्वाधिक पदकांची अपेक्षा आहे. पुरुष बॉक्सिंगमध्ये भारताकडून अमित पंघल व निशांत देव हे दोनच बॉक्सर रिंगमध्ये उतरणार आहेत. त्यातील अमित देशाला मेडल देईल असे सर्वांना वाटते.

अमित हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील मायना गावचा. त्याचे वडील विजेंदर हे साधे शेतकरी. त्याचा मोठा भाऊ अजय हा हौशी बॉक्सर होता. तसेच, भारतीय सैन्यात असल्याने त्याला खेळांची आवडही होती‌. त्याला मोठा खेळाडू कोणता आले नाही. मात्र, आपल्या भावाला त्याने खेळाडू बनण्यास मदत केली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

भावाला पाहून अमित याने बॉक्सिंग सुरू केली होती. त्याला अजय सर छोटूराम यांच्या बॉक्सिंग अकादमीत घेऊन गेला. उंचीने काहीसा कमी असलेला अमित हालचाली मात्र वेगवान करायचा. सोबतच त्याच्या पंचमध्ये ताकदही होती. याचाच फायदा घेत त्याने वेगाने प्रगती केली. 2017 मध्ये नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकत त्याने सीनियर स्तरावर चमकण्यास सुरुवात केली. वर्षभरात तो इंडियन आर्मीच्या महार बटालियनमध्ये कार्यरत झाला. सेनादलाचा भाग झाल्यामुळे त्याला आपल्या करिअर कडे गांभीर्याने पाहायची संधी मिळाली.

Paris Olympics 2024: मेडलचे 15 दावेदार| भारतीय नेमबाजांकडून तीन मेडलवर निशाण्याची अपेक्षा, 12 वर्षांचा दुष्काळ यंदा संपणार?

अमित 2018 कॉमनवेल्थमध्ये सहभागी झाला. आपल्या पहिल्याच कॉमनवेल्थमध्ये त्याला सिल्वर जिंकण्यात यश आले होते. तर, जकार्ता येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये मात्र त्याने गोल्ड आणले. पुढील वर्षी पुन्हा एकदा एशियन चॅम्पियन बनत त्याने आपला दबदबा निर्माण केला. टोकियो ऑलिंपिक्समध्ये सहभागी होईपर्यंत अमित आपल्या कॅटेगरीमध्ये नंबर वन बॉक्सर बनलेला. ऑलिंपिक्समध्ये सहभागी होताना त्याला मेडलचा दावेदार मानले जात होते. मात्र, क्वार्टर फायनलमध्ये त्याला दुर्दैवाने पराभूत व्हावे लागले. ऑलिंपिक मेडलचे शल्य त्याने 2022 बर्मिंगहॅम कॉमनवेल्थमध्ये गोल्ड जिंकत काही प्रमाणात भरून काढले.

विजेंदर सिंग याने 2008 बीजिंग ऑलिंपिकमध्ये भारतासाठी बॉक्सिंगचे पहिले मेडल जिंकलेले. त्यानंतर तीन ऑलिंपिक्समध्ये भारतीय पुरुष बॉक्सरच्या हाती काही लागलेले नाही. आता अमित पॅरिसमध्ये गोल्डन पंच मारणार, याबाबत भारतीय चाहते अत्यंत आशावादी आहेत.

(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics Boxer Amit Panghal)

अधिकचे वाचा-

Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार: कहाणी ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची! 140 कोटी भारतीयांना अपेक्षा दुसऱ्या सुवर्ण फेकीची

 Paris Olympics 2024:‌ ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| गोष्ट फुलराणी पीव्ही सिंधूची! देशाला आशा मेडल हॅट्रिकची

Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| फायटर लवलिना पॅरिसमध्ये लगावणार गोल्डन पंच?

Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| 140 कोटी भारतीयांच्या अपेक्षांचा भार उचलायला मीराबाई सज्ज, यंदा लक्ष्य गोल्डच!

Paris Olympics 2024: मेडलचे 15 दावेदार| हॉकीला पुन्हा येणार ‘सोन्या’चे दिवस, वाचा भारतीय हॉकीचा गौरवशाली इतिहास

पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| Satwik-Chirag कडून मेडलची गॅरंटी? बॅडमिंटन विश्वात त्यांचीच चर्चा

पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| ‘देश की बेटी’ Vinesh Phogat यंदा देणार धोबीपछाड

पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| Nikhat Zareen ठरणार डार्क हॉर्स? बॉक्सिंच्या दुसऱ्या मेडलची आस

पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| Dhiraj Bommadevara मारणार मेडलवर बाण? टीमही ऐतिहासिक निकालासाठी सज्ज

पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| युवा Lakshya Sen च्या रॅकेटमधून येणार ‘गोल्डन स्मॅश?

Exit mobile version