Breaking News

तब्बल 104 वर्षांनंतर! पर्थ कसोटी ठरली Ashes Series मधील रेकॉर्डब्रेकर, वाचा सारे विक्रम

ashes series
Photo Courtesy: X

Ashes Series 2025-2026: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUSvENG) यांच्या दरम्यानची पहिली कसोटी दुसऱ्या दिवशी समाप्त झाली. पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून विजय संपादन केला. मिचेल स्टार्क व ट्रेविस हेड या विजयाचे शिल्पकार ठरले. मात्र, अवघ्या दोन दिवस चाललेल्या या कसोटीत अनेक नवे विक्रम बनले. त्यावर टाकूया नजर.

Ashes Series 2025-2026 Records In Perth Test

वेगवान गोलंदाजांसाठी नंदनवन असलेला पर्थ कसोटीत अवघ्या दोनच दिवसात सामन्याचा निकाल लागला. मात्र, दोन दिवसांत तब्बल 32 बळी गेले. तब्बल 104 वर्षांनंतर ऍशेस मालिकेतील सामना दोन दिवसात संपलेला आहे. नॉटिंगहॅम येथे 1921 मध्ये दोन दिवसात सामन्याचा निकाल लागलेला. तर, पर्थ मैदानावर पहिल्यांदाच चौथ्या डावात फलंदाजी करणारा संघ विजयी झाला.

चेंडूच्या दृष्टीने हा ऍशेस मालिकेतील तिसरा सर्वात छोटा सामना ठरला. या सामन्यात 847 चेंडूंचा खेळ झालेला. यापूर्वी 1888 मध्ये मॅंचेस्टर येथे 788 व लॉर्ड्स येथे 792 चेंडूंचे सामने झाले होते. याचाच अर्थ 20 व्या आणि 21 व्या शतकात इतक्या कमी चेंडूंचे सामने खेळले गेले नाहीत.

ट्रेविस हेड याने केवळ 69 चेंडूंमध्ये केलेले हे शतक ऍशेस इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले. क्रिकेटच्या कोणत्याही स्वरूपात सलामी फलंदाजाकडून आलेले हे संयुक्त वेगवान शतक आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाने 28.2 षटकात केलेला धावांचा पाठलाग कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील चौथा सर्वात वेगवान पाठलाग ठरला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: हेडच्या शतकी तडाख्याने ऑस्ट्रेलियाची Ashes 2025-2026 मध्ये विजयी सुरुवात, पर्थ कसोटी दुसऱ्याच दिवशी निकाली

Exit mobile version