Breaking News

Thomas Cup & Uber Cup: चीनचे दुहेरी यश! प्रतिष्ठेचे थॉमस आणि उबेर कप केले नावे

बॅडमिंटन जगतातील विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थॉमस कप (Thomas Cup) व उबेर कप (Uber Cup) या स्पर्धांवर चीनने पुन्हा एकदा कब्जा केला आहे. पुरुष संघाने इंडोनेशियाला पराभूत करत अकराव्यांदा थॉमस कप जिंकला तर, महिला संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत इंडोनेशियन महिला संघाला पराभूत करत 16 व्या वेळी उबेर कप उंचावला. (China Badminton Team)

चीनचा पुरुष संघ 2018 पासून थॉमस कप जिंकू शकला नव्हता. त्यावेळी त्यांनी जपानला पराभूत केले होते. तसेच दोन वर्षांपूर्वी भारताकडून अंतिम फेरीत पराभूत झालेल्या इंडोनेशिया संघाकडे यावेळी विजेतेपद जिंकण्याची संधी होती. मात्र, चीनच्या संघाने आक्रमक खेळ दाखवत इंडोनेशियाला 3-1 असे पराभूत करून विजेतेपदाची माळ गळ्यात घातली. दुसऱ्या बाजूला महिला संघाने इंडोनेशियाला प्रतिकाराची कोणतीही संधी दिली नाही व 3-0 असे निर्भळ यश मिळवत, आपल्या देशाला दुहेरी मुकुट मिळवून दिला.

2 comments

  1. Thanks for one’s marvelous posting! I really enjoyed reading it, you may be a great author.I will ensure that I bookmark your blog and may come back in the future. I want to encourage you to ultimately continue your great work, have a nice weekend!

  2. Whats Happening i am new to this, I stumbled upon this I have found It positively useful and it has aided me out loads. I hope to give a contribution & assist different users like its helped me. Great job.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version