Breaking News

Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या 11 जणांना RCB करणार आर्थिक मदत, इतकी रक्कम देण्याचे वचन

Chinnaswamy stadium stampede
Photo Courtesy: X

Chinnaswamy Stadium Stampede: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयपीएल 2025 (IPL 2025) चे विजेतेपद पटकावले. त्यानंतर 4 जून रोजी संघाची विक्टरी परेड बंगळुरू येथील विधान सौधा ते चिन्नास्वामी स्टेडियम येथे आयोजित केली गेली होती. मात्र, या परेडसाठी जमलेल्या लाखो चाहत्यांना चेंगराचेंगरीचा सामना करावा लागला. ज्यामध्ये 11 चाहत्यांनी जीव गमावला. त्यानंतर आरसीबी व्यवस्थापनाने या चाहत्यांना नुकसान भरपाई देण्याचे वचन दिले आहे. 

Chinnaswamy Stadium Stampede RCB Gives 10 Lakhs To Each

बुधवारी झालेल्या या चेंगराचेंगरीत 11 जणांनी प्राण गमावले. तर, 25 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले. त्यानंतर कर्नाटक सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचे जाहीर केले. तसेच, जखमींवर मोफत उपचार करण्याचे आश्वासन दिले. आता आरसीबी व्यवस्थापनाने देखील अधिकृतरित्या जाहीर केले आहे की, चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या प्रियजनांना प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यात येतील. तसेच, आरसीबी केअर्स नावाने असलेल्या फंडातून जखमींना मदत करण्यात येईल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

Chinnaswamy Stadium Stampede

Chinnaswamy Stadium Stampede: RCB ची संवेदनहीनता, 11 मृ’त्यूनंतरही सेलिब्रेशन सुरूच

Exit mobile version