Breaking News

Barinder Sran Retirement! केवळ 8 सामने खेळून भारतीय वेगवान गोलंदाजाने घेतली निवृत्ती, उडाली सर्वत्र खळबळ

barinder sran
Photo Courtesy: X

Barinder Sran Retirement: क्रिकेट वर्तुळात सध्या निवृत्यांचे सत्र सुरू आहे. मागील 24 तासात तीन क्रिकेटपटूंनी निवृत्ती जाहीर केली. तसेच आठवडाभरात जवळपास सहा खेळाडूंनी क्रिकेटला रामराम केला. आता यामध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. भारतासाठी आठ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला वेगवान गोलंदाज बरिंदर सरन (Barinder Sran) याने गुरूवारी (29 ऑगस्ट) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली‌. सोशल मीडिया पोस्ट करत त्याने याबाबत माहिती दिली.

Barinder Sran Annouced Retirement From All Forms Of Cricket

डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणाऱ्या सरन याने सोशल मीडिया पोस्ट करताना लिहिले, ‘ मी अधिकृतपणे माझे बूट टांगतो. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासाकडे मी कृतज्ञतेने बघतो. 2009 मध्ये बॉक्सिंग सोडून क्रिकेटर बनण्याच्या मी घेतलेल्या निर्णयाने मला नेहमीसाठी एक अनुभव दिला.’ त्याने या पोस्टमध्ये आपल्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. तसेच भविष्याचे नवे पर्व सुरू करत असल्याचे त्याने म्हटले.

सरन याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात बॉक्सर म्हणून केली होती. मात्र, नंतर त्याने क्रिकेटकडे करिअर म्हणून पाहिले. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी चांगली कामगिरी केल्यानंतर, त्याला 2015 मध्ये भारतीय संघात स्थान मिळाले. त्याने भारतासाठी सहा वनडे व दोन टी20 सामने खेळले. याव्यतिरिक्त तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स व मुंबई इंडियन्स या संघांचा देखील सदस्य राहिला. त्याने 2022 मध्ये मुंबईसाठी आपला अखेरचा आयपीएल सामना खेळला होता.

(Indian Pacer Barinder Sran Annouced Retirement)

हे वाचलंत का?

क्रिकेटविश्वात चाललंय तरी काय? ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अवघ्या 26 व्या वर्षी निवृत्त, धक्कादायक कारण समोर

Exit mobile version