Breaking News

Duleep Trophy 2024: पहिल्या दिवशी बडे नाम फ्लॉप! सर्फराजचा भाऊ मुशीरचे झुंजार शतक, वाचा दोन्ही सामन्यांचा पूर्ण वृतांत

Duleep Trophy 2024
Photo Courtesy: X/BCCI Domestic

Duleep Trophy 2024: गुरुवारी (5 सप्टेंबर) भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत हंगामाला सुरुवात झाली. बेंगलोर आणि अनंतपूर येथे दुलिप ट्रॉफी 2024 (Duleep Trophy 2024) स्पर्धेच्या पहिल्या दोन फेरीचे सामने खेळले जात आहेत. पहिल्या दिवशी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक बड्या खेळाडूंना अपयश आले. दुसरीकडे, युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पहिला दिवस गाजवला. या दोन्ही सामन्यांच्या पहिल्या दिवसाचा सविस्तर वृत्तांत आपण घेऊया (Duleep Trophy).

Duleep Trophy 2024 Day 1

पहिला सामना (भारत अ विरुद्ध भारत ब)-

बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत अ आणि भारत ब (INDA v INDB) यांच्यातील पहिला सामना सुरू झाला. शुबमन गिल याच्या नेतृत्वातील भारत अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाज करण्याचा निर्णय घेतला. भारत ब संघासाठी कर्णधार अभिमन्यू ईस्वरन व यशस्वी जयस्वाल यांनी 33 धावांची सलामी दिली. अभिमन्यू याने 13 तर यशस्वी याने 30 धावांची खेळी केली. लंच करून तर त्यांनी दोन बाद 76 अशी सन्मानजनक मजल मारली होती.

लंचनंतर मात्र भारत ब च्या वेगवान गोलंदाजांनी भारत अ ची मधली फळी कापून काढली. आवेश खान याने सर्फराज खान याला 9 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आकाशदीप याने रिषभ पंत याला 7 तर नितीशकुमार रेड्डीला खातेही न खोलू देता माघारी पाठवले. वॉशिंग्टन सुंदर हा देखील शून्यावर धाव‌बाद झाला. दुसरा अष्टपैलू साई किशोर हा केवळ एका धावेची भर घालू शकला.‌ साईकिशोर बाद झाला तेव्हा संघाची अवस्था 7 बाद 94 अशी होती.

संघ अडचणीत असताना सर्फराज खान याचा लहान भाऊ मुशीर खान (Musheer Khan) याने डावाची जबाबदारी आपल्याकडे घेतली. त्याने नवदीप सैनी याच्यासोबत डाव सावरला. यादरम्यान सर्फराज याने आपले शतक पूर्ण केले. त्याने दुलिप ट्रॉफी पदार्पणातच शतक झळकावण्याची कामगिरी केली. सैनी याने देखील 74 चेंडूंमध्ये नाबाद 29 धावा करत त्याला दिवस संपेपर्यंत साथ दिली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत ब संघाने 7 बाद 202 धावा केल्या होत्या. मुशीर 227 चेंडूंमध्ये 10 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 105 धावा केल्या आहेत. भारत अ साठी खलील, आकाश दीप व आवेश यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

दुसरा सामना (भारत क विरूद्ध भारत ड)

दुलिप ट्रॉफी 2024 मधील दुसरा सामना भारत क विरुद्ध भारत ड (INDC v INDD) यांच्या दरम्यान अनंतपूर येथे खेळला जात आहे. भारत क संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून भारत ड संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्याचा हा निर्णय अंशुल कंबोज, व विजयकुमार वैशाक यांनी योग्य ठरवला. त्यांनी कर्णधार श्रेयस अय्यर याच्यासह आघाडीचे चार फलंदाज केवळ 23 धावांमध्ये माघारी पाठवले. त्यानंतर त्यांचे पुढील दोन फलंदाज 48 धावा येईपर्यंत तंबूत परतले होते.

यानंतर डावाची जबाबदारी अनुभवी अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) याने खांद्यावर घेतली. त्याने दबाव झुगारून देत आक्रमक फटकेबाजी करताना केवळ 118 चेंडूत 86 धावा बनवल्या. यामध्ये प्रत्येकी सहा चौकार व सहा षटकारांचा समावेश होता. तळातील फलंदाज फारसा प्रतिकार करू न शकल्याने भारत ड संघाचा डाव 164 धावांवर समाप्त झाला. भारत क साठी विजयकुमार वैशाक याने सर्वाधिक तीन बळी टिपले. तर, कंबोज व हिमांशू चौहान प्रत्येकी दोन बळी घेण्यात यशस्वी ठरले.

पहिल्या दिवशीच आपला पहिला डाव खेळण्याची संधी मिळालेल्या, भारत क संघाची सुरुवातही तितकी चांगली नाही राहिली. वेगवान गोलंदाज हर्षित राणा याने कर्णधार ऋतुराज गायकवाड याला पाच व साई सुदर्शन याला 13 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. ऋतुराज याला बाद केल्यानंतर त्याने आपले बहुचर्चित फ्लाईंग किस (Harshit Rana Flying Kiss) सेलिब्रेशन देखील केले. त्यानंतर आर्यन जुयाल 12 व रजत पाटीदार ‌13 धावा करू शकले. दिवस संपेपर्यंत बाबा इंद्रजीत (नाबाद 15) व अभिषेक पोरेल (नाबाद 32) यांनी 48 धावांची नाबाद भागीदारी केली. त्यामुळे भारत क दिवस संपेपर्यंत 4 बाद 91 धावांपर्यंत पोहोचला. भारत ड साठी हर्षित व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

अनुभवी खेळाडू अपयशी 

आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत अनुभवी खेळाडूंना पहिल्या दिवशी छाप पडता आली नाही. कसोटी संघातील पुनरागमनाच्या प्रतीक्षेत असलेला श्रेयस अय्यर केवळ 9 धावा करू शकला. तर, सलामीवीर म्हणून तिसरा पर्याय होण्याची शक्यता असलेला ऋतुराज गायकवाड देखील‌ पाच धावांच्या पुढे गेला नाही.‌ यासोबतच रजत पाटीदार देखील संधीचे सोने करण्यात अपयशी ठरला. गोलंदाजीत अर्शदीप सिंग हा देखील 8 षटकात एकही बळी घेऊ शकला नाही.‌ अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादव याचे खाते देखील रिकामे राहिले.

(Duleep Trophy 2024 Day 1 Musheer Khan Axar Patel Shines)

हे देखील वाचा 

Lowest Total In T20I: काय सांगता? आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये फक्त 10 धावांत ऑल-आऊट झाला संघ, वाचा सविस्तर

Exit mobile version