Breaking News

US Open 2024: पुरूष एकेरीच्या सेमीफायनल ठरल्या, महिला एकेरीतूनही आला धक्कादायक निकाल

us open 2024
Photo Courtesy; X/Jannik Sinner

US Open 2024: वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या युएस ओपन 2024 (US Open 2024) च्या पुरुष एकेरीचे उपांत्य फेरीचे (US Open 2024 Semi Final) सामने निश्चित झाले आहेत. अव्वल मानांकित जानिक सिन्नर (Jannik Sinnar) याने अनुभवी डॅनियल मेदवेदेव (Daniel Medvedev) याला 6-2, 1-6, 6-1, 6-4 असे पराभूत करत उपांत्य फेरीत जागा पटकावली. त्याचबरोबर महिला एकेरीतील अव्वल मानांकित ईगा स्वियाटेक (Iga Swiatek) हिला देखील महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत व्हावे लागले.

US Open 2024 Semi Final Line Up

कार्लोस अल्कारेझ व नोवाक जोकोविच हे लवकर बाहेर पडल्यानंतर सिन्नर व मेदवेदेव हे विजेतेपदाचे दावेदार शिल्लक राहिले होते. आता मेदवेदेव हा देखील स्पर्धेतून बाहेर पडला आहे. उपांत्य फेरीत सिन्नर याचा सामना ब्रिटनच्या जॅक ड्रेपर याच्याशी होईल. दुसऱ्या उपांत्य सामन्यात अमेरिकेचे टेलर फ्रिट्झ व फ्रान्सेस टिफोई हे भिडतील. विशेष म्हणजे यावेळी युएस ओपनला पुरुष एकेरी व महिला एकेरीत नवा विजेता मिळणार आहे.

महिला एकेरीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जेसिका पेगुला (Jessica Pegula) हिने अव्वल मानांकित पोलंडच्या ईगा स्वियाटेक हिला 6-4, 6-2 असे पराभूत केले. उपांत्य फेरीत जागा बनवणाऱ्या इतर तीन खेळाडू देखील प्रथमच स्पर्धेचा उपांत्य सामना खेळतील.

(Jannik Sinnar Entered In US Open 2024 Men’s Semi Final)

हे देखील वाचा 

Lowest Total In T20I: काय सांगता? आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये फक्त 10 धावांत ऑल-आऊट झाला संघ, वाचा सविस्तर

Exit mobile version