Breaking News

ENG vs IND Manchester Test Day 4: गिल-राहुल लढले! वाचा Day 4 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind manchester test day 4
Photo Courtesy: X

ENG vs IND Manchester Test Day 4 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना मॅंचेस्टर येथे खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने 311 धावांची आघाडी घेतली. त्याचा पाठलाग करताना खराब सुरुवातीनंतर भारतासाठी कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) व‌ केएल राहुल ( KL Rahul) यांनी नाबाद दीडशतकी भागीदारी करत सामना वाचवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू ठेवले. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने दमदार शतक ठोकले.

ENG vs IND Manchester Test Day 4 Highlights

– चौथ्या दिवशी इंग्लंडने 7‌‌ बाद 544 वरून केली सुरुवात

– लियाम डॉसनला 26 धावांवर बुमराहने केले त्रिफळाचित

– बेन स्टोक्स व ब्रायडन कार्स यांनी स्वीकारले आक्रमक धोरण

– स्टोक्सने पूर्ण केले आपले मालिकेतील पहिले शतक

– एकाच सामन्यात पाच बळी व शतक करणारा पहिला इंग्लिश कर्णधार बनला स्टोक्स

– स्टोक्स व कार्सची 96 चेंडू मध 95 धावांची आक्रमक भागीदारी

– स्टोक्स 141 तर कार्स 47 धावांवर बाद, इंग्लंड सर्व बाद 669

– भारतासाठी रवींद्र जडेजाचे सर्वाधिक चार बळी

-इंग्लंडकडे पहिला डावा 311 धावांची भागीदारी

– भारताची अत्यंत खराब सुरुवात, जयस्वाल व साई सुदर्शन खाते हे न खुलता पहिल्याच षटकात बाद

– लंचपर्यंत भारत 2 बाद 1

– दुसऱ्या सत्रात कर्णधार गिल व राहुल यांची संयमी फलंदाजी

– शुबमन गिलचे मालिकेत आणखी एक अर्धशतक

– राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या 9000 धावा

– चहापानापर्यंत भारत 2 बाद 86

– अखेरच्या सत्रातही राहुल व गिल यांची टिच्चून फलंदाजी

– गिल बनला इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा विदेशी कर्णधार

– दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारत 2 बाद 174, गिल 78 व राहुल 87 धावांवर नाबाद

– इंग्लंडकडे अद्याप 137 धावांची आघाडी, अखेरच्या दिवशी भारतासमोर सामना वाचवण्याचे आव्हान

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा:

ENG vs IND Manchester Test Day 1: डाव्यांनी गाजवला दिवस, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स

ENG vs IND Manchester Test Day 2: दुसरा दिवस यजमानांचा! वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स

ENG vs IND Manchester Test Day 3: इंग्लंडची टीम इंडियावर कुरघोडी, वाचा Day 3 च्या सर्व हायलाईट्स

Exit mobile version