Breaking News

Hardik Pandya चे नशीब पुन्हा रूसले! कॅप्टन्सीच्या नादात उपकर्णधारपदही गेले, या 3 कारणांनी झाले डिमोशन

Hardik Pandya
Photo Courtesy: X/ Hardik Pandya

Hardik Pandya Demotion: जुलै महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी (India Tour Of Srilanka 2024) भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) घोषणा (India Sqaud For Srilanka Tour) करण्यात आली आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ वनडे व टी20 मालिका खेळल्या जाणार आहेत. या मालिकांसाठी एकवेळ कर्णधारपदाचा दावेदार असलेल्या हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आपले उपकर्णधारपदही वाचवू शकला नाही (Hardik Pandya Demotion).

श्रीलंका दौऱ्याआधी रोहित शर्माने अनुपस्थिती दर्शवल्यास वनडे संघाचा कर्णधार म्हणून हार्दिक याच्या नावाची चर्चा होते. तर, टी20 विश्वचषकात उपकर्णधार असल्याने टी20 संघाचा तो कर्णधार बनेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, वैयक्तिक कारणाने त्याने आधीच वनडे मालिकेतून माघार घेतली. तरीही, टी20 संघाचा कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते.

हे देखील वाचा- India Squad For Srilanka Tour: श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, असे आहेत वनडे आणि टी20 संघ

गुरुवारी (18 जुलै) श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यावर रोहित शर्मा याच्याकडेच वनडे संघाचे नेतृत्व राहिले. तर, टी20 संघाचा नवा कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव याच्या नावाची घोषणा केली गेली. विशेष म्हणजे दोन्ही संघाचा उपकर्णधार म्हणून शुबमन गिल (Shubman Gill) याच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे हार्दिकच्या पदरी निराशा पडली. त्याचा केवळ टी20 संघात समावेश केला गेला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

सूर्यकुमार हा टी20 कर्णधार बनण्याचे सर्वात मोठे कारण मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हा दिसून येतो. सूर्यकुमार याने आयपीएलमध्ये गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सचे उपकर्णधारपद भूषवले होते. त्याचवेळी हार्दिक अनेकदा दुखापतींमुळे किंवा वैयक्तिक कारणाने बऱ्याच मालिकांना मुकतो. यासोबतच बीसीसीआय भविष्याच्या दृष्टीने शुबमन गिल याला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.

(Hardik Pandya Demoted By BCCI For Srilanka Tour)

हे देखील वाचा- 10 वर्ष मोठ्या टीव्ही स्टारसोबत जोडले जातेय शुबमनचे नाव, अभिनेत्री म्हणाली, “तो खूप क्युट…”

Exit mobile version