Breaking News

घटस्फोटाच्या महिनाभरानंतरच हार्दिक रिलेशनशिपमध्ये? वाचा कोण आहे ब्रिटिश सुंदरी Jasmin Walia

JASMIN WALIA
Photo Courtesy: IG/Hardik Pandya/Jasmin Walia

Hardik Pandya In Relationship With British Singer Jasmin Walia: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याचा नुकताच घटस्फोट झाला आहे. त्याने व त्याची पत्नी नतासा स्टॅन्कोविक (Hardik Natasha Separated) यांनी संगनमताने वेगळे होण्याचा निर्णय घेतलेला. त्यानंतर आता हार्दिक पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये आल्याची चर्चा सुरू झाली आहे. ब्रिटिश इंडियन गायिका जस्मिन वालिया (Jasmin Walia) हिच्यासोबत त्याचे नाव जोडले जातेय (Hardik Pandya Rumoured Girlfriend Jasmin Walia).

हार्दिक व नतासा यांनी चार वर्ष संसार केल्यानंतर मागील महिन्यात वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता हार्दिक व जस्मिन हे नात्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. हार्दिक सध्या ग्रीस येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्याने तेथील काही छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली. विशेष म्हणजे जस्मिन हिने देखील त्याच ठिकाणाची काही छायाचित्रे जवळपास एकाच वेळी पोस्ट केल्याच्या दिसते. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी अंदाज व्यक्त केला आहे की, ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. जस्मिन आयपीएल 2024 वेळी देखील मुंबई इंडियन्सच्या काही सामन्यांना हजर होती. तसेच, हार्दिक याने तिच्या काही इंस्टाग्राम पोस्ट लाईक केल्याचे देखील दिसून आले आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

भारतीय वंशाची ब्रिटिश गायिका आणि टेलिव्हिजन स्टार असलेल्या जस्मिन हिने इंग्लिश, पंजाबी आणि हिंदी गाणी गायली आहेत. तिने 2017 मध्ये झॅक नाईट याच्यासोबत बॉम डिगी हे सिंगल गायले होते. त्यानंतर त्याला अल्पावधीत मोठी प्रसिद्ध मिळालेली. त्यानंतर तिने याच गाण्याचे हिंदी व्हर्जन 2018 मध्ये सोनू के टिटू के स्विटी या चित्रपटात वापरले गेले.

(Hardik Pandya In Relationship With British Singer Jasmin Walia)

Team India Bowling Coach: अखेर सस्पेन्स संपला! 544 बळी घेतलेला दिग्गज बनला टीम इंडियाचा बॉलिंग कोच

Exit mobile version