Breaking News

हॉकीला पुन्हा सोन्याचे दिवस! Hockey India League मध्ये इतक्या हजार कोटींची होणार उलाढाल, संघांचीही घोषणा

hockey india league
Photo Courtesy: X

Hockey India League 2024-2025: हॉकी इंडिया (Hockey India) ने तब्बल सात वर्षांच्या ब्रेकनंतर हॉकी इंडिया लीग (Hockey India League) स्पर्धेची घोषणा केली आहे. स्पर्धेचा अखेरचा हंगाम 2017 मध्ये खेळला गेला होता. त्यानंतर आता एचआयएल 2024-2025 (HIL 2024-2025) 28 डिसेंबर ते 1 फेब्रुवारी दरम्यान खेळली जाईल. पुरुष आणि महिला अशा दोन्ही विभागात ही स्पर्धा होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी स्पर्धेत हजारो कोटींची उलाढाल होईल.

नुकत्याच पार पडलेल्या हॉकी इंडियाच्या पत्रकार परिषदेत अनेक बाबींचा खुलासा करण्यात आला. देशभरातील आठ शहरातील संघ विविध संघमालकांनी खरेदी केले आहेत. स्पर्धेत आठ पुरुष व सहा महिला संघ सहभागी होतील. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने (FIH) ने वेगळी विंडो दिली आहे. स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव 14-15 ऑक्टोबर रोजी होईल.

मिळत असलेल्या माहितीनुसार, हॉकी इंडियाने प्रत्येक संघमालकाशी दहा वर्षाचा करार केला असून, 3,640 कोटींची उलाढाल या दहा वर्षात होण्याचा अंदाज बांधला गेला आहे. खेळाडूंच्या लिलावात प्रत्येक संघाला सात कोटी रुपये खर्च करता येतील. यामध्ये 24 खेळाडूंचा समावेश त्यांना करता येऊ शकतो. यामध्ये 16 भारतीय खेळाडू निवडले जाऊ शकतात. त्यापैकी चार खेळाडू कनिष्ठ गटातील असणे आवश्यक आहे. खेळाडूंची बेस्ट प्राईस ही दोन लाख, चार लाख व दहा लाख इतकी असेल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

पुरुष स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये दिल्ली, हैदराबाद, पंजाब, चेन्नई, लखनऊ, कोलकाता, रांची‌ व ओडिसा या संघांचा समावेश आहे. तर महिला स्पर्धेत हरियाणा, कोलकाता, दिल्ली व ओडिसा हे संघ अंतिम झाले आहेत. महिला स्पर्धेत आणखी दोन संघ सहभागी होतील. ज्याची घोषणा खेळाडूंच्या लिलावावेळी करण्यात येईल. विशेष म्हणजे दोन्ही स्पर्धेत आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या एकाही संघाचा समावेश नाही. पुरुषांची स्पर्धा राऊरकेला व महिलांची स्पर्धा रांची येथे खेळली जाईल.

भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो व पॅरिस अशात सलग दोन ऑलिंपिक्समध्ये कांस्यपदक जिंकून पुन्हा एकदा हॉकीला सोन्याचे दिवस आणल्याचे बोलले जाते. आगामी काळात भारतीय संघ विश्वचषकात कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

(Hockey India League 2024-2025 Annouced)

हे देखील वाचा: 

Tanush Kotian: मुंबईने तयार केला अश्विनचा उत्तराधिकारी! छोट्याशा करिअरमध्ये दाखवला स्पार्क, आकडेवारी एकदमच दर्जा

Exit mobile version