Breaking News

Tejas Shirse| फिनलॅंडमध्ये संभाजीनगरच्या तेजसने रोवला यशाचा झेंडा, राष्ट्रीय विक्रमासह जिंकले सुवर्ण

Tejas Shirse
Photo Courtesy: X/Tejas Shirse

Tejas Shirse Won Gold|फिनलॅंड येथील जेवीस्कीला येथे वर्ल्ड ऍथलेटिक कॉन्टिनेन्टल टूर ही स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरू असून, अनेक युवा खेळाडू पदके जिंकत आहेत. यामध्ये आता संभाजीनगरच्या तेजस शिरसे (Tejas Shirse) याची भर पडली असून, त्याने राष्ट्रीय विक्रमासह या स्पर्धेत 110 मीटर हर्डल स्पर्धेचे सुवर्णपदक खिशात घातले.

तेजस याने 110 मीटर हर्डल धावण्याच्या शर्यतीत यापूर्वीच अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. अंतिम शर्यतीत त्याने 13.41 सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. त्याने सिद्धार्थ थिंगालीया याचा 2017 मध्ये केलेला 13.48 सेकंदाचा विक्रम मोडीत काढला. त्याला या स्पर्धेचे सुवर्णपदक मिळाले असले तरी पॅरिस ऑलिंपिकसाठी आवश्यक असलेली 13.27 सेकंद ही वेळ गाठण्यात तो अपयशी ठरला.

तेजस हा सध्या देशातील अग्रगण्य 110 मीटर हर्डल धावक आहे. त्याने मागील वर्षी फेडरेशन कप, आंतरराज्य चॅम्पियनशिप आणि राष्ट्रीय खेळांमध्ये देखील सुवर्णपदक जिंकले आहे. सध्या केवळ 21 वर्षांचा असलेला तेजस संभाजीनगर येथील रहिवासी असून, तो सुरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

तेजस सोबतच भारताची प्रमुख 100 मीटर हर्डल धावक ज्योती याराजी ही देखील सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरली. मात्र, तिला देखील पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट मिळवता आले नाही.

(Hurdle Runner Tejas Shirse Won Gold In World Athletics Continental Tour At Finland)

One comment

  1. I am not very great with English but I line up this very easy to read .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version