Breaking News

Iga Swiatek बनली Wimbledon 2025 ची राणी! अवघ्या 32 मिनिटांत अनिसिमोवाची शरणागती

iga swiatek
Photo Courtesy; X

Iga Swiatek Won Wimbledon 2025: वर्षातील तिसरी ग्रॅंडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डनच्या महिला एकेरीचा अंतिम सामना शनिवारी (12 जुलै) पार पडला. पोलंडच्या इगा स्वियाटेक हिने अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवा (Amanda Anisimova) हिचा सरळ सेटमध्ये फक्त 32 मिनिटांमध्ये फडशा पडत विम्बल्डन आपल्या नावे केले. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच पोलिश खेळाडू बनली आहे.

Iga Swiatek Won Wimbledon 2025

आपली दुसरी ग्रॅंडस्लॅम फायनल खेळत असलेल्या इगा स्वियाटेकने या सामन्यात अमांडाला प्रतिकाराची संधीच दिली नाही. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात कमी वेळ चाललेल्या या सामन्यात तिने 6-0,6-0 असा सहज विजय मिळवला. हा सामना केवळ 32 मिनिटे चालला. यापूर्वी केवळ स्टेफी ग्राफने अशा गुण फरकाने विजय मिळवलेला. इगाने यापूर्वी 2024 फ्रेंच ओपन जिंकण्याची कामगिरी केली होती.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: KL Rahul बनला‌ लॉर्ड्सचा लॉर्ड! दमदार शतकासह दुसऱ्यांदा कोरले ऑनर्स बोर्डवर नाव

Exit mobile version