Breaking News

ENG vs IND Lords Test Day 3: भारतीय फलंदाजांनी इंग्लंडला दमवले, वाचा Day 3 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind lords test day 3
Photo Courtesy: X

ENG vs IND Lords Test Day 3 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी टिच्चून फलंदाजी केली. केएल राहुल याचे शतक (KL Rahul Lords Century) व‌ रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांची अर्धशतके तिसऱ्या दिवसाची वैशिष्ट्ये ठरली. 

ENG vs IND Lords Test Day 3 Highlights

– भारताने 3 बाद 145 वरून केली दिवसाची सुरुवात

– केएल राहुल व रिषभ पंत यांनी रचली भागीदारी

– पंतने पूर्ण केले दौऱ्यावरील दुसरे अर्धशतक

– लंचआधीच्या अखेरच्या षटकात रिषभ 74 धावांवर दुर्दैवीरित्या धावबाद

– राहुल-पंतची 141 धावांची भागीदारी

– लंचपर्यंत भारत 4 बाद 248

– दुसरे सत्र सुरू होताच राहुलने पूर्ण केले 10 वे कसोटी शतक

– लॉर्ड्सवरील राहुलचे दुसरे शतक तसेच दौऱ्यावरीलही दुसरे शतक

– शतक होताच 100 धावांवर बाद झाला राहुल

– राहुल बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजा व नितिशकुमार रेड्डी या अष्टपैलूंनी सावरला डाव

– दुसरे सत्र खेळून काढत केली अर्धशतकी भागीदारी

– चहापानाला खेळ थांबला तेव्हा भारताने केल्या 5 बाद 316 धावा

– अखेरच्या सत्राच्या सुरुवातीला रेड्डी 30 धावा करून बाद

– जडेजाने आपला शानदार फॉर्म कायम राखत ठोकले आणखी एक अर्धशतक

– जडेजाची 72 धावांची लाजवाब खेळी

– जडेजा व वॉशिंग्टन सुंदर यांची 50 धावांची निर्णायक भागीदारी

– भारताचे अखेरचे तीन फलंदाज केवळ 11 धावांमध्ये बाद

– इंग्लंडसाठी ख्रिस वोक्सचे सर्वाधिक 3 बळी

– दोन्ही संघांची पहिल्या डावात 387 अशी समान धावसंख्या

– दिवसाचा खेळ संपण्याआधी इंग्लंडला मिळाले केवळ एक षटक

– इंग्लंडकडे 2 धावांची आघाडी

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ENG vs IND Lords Test Day 2: बुमराहच्या बूमनंतर फलंदाजांनी दाखवली जिगर, वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स

ENG vs IND Lords Test Day 1: रूटने गाजवला पहिला दिवस, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स

 

 

Exit mobile version