Breaking News

Duleep Trophy 2024 इंडिया ए कडे! ऋतुराजच्या संघाची अखेरच्या क्षणी हाराकिरी

DULLEEP TROPHY 2024
Photo Courtesy; X

Duleep Trophy 2024: भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत हंगामातील पहिली स्पर्धा असलेल्या दुलिप ट्रॉफी (Duleep Trophy) स्पर्धेचा नवा हंगाम (Duleep Trophy 2024) समाप्त झाला. अखेरच्या साखळी सामन्यात मयंक अगरवाल (Mayank Agarwal) याच्या नेतृत्वातील इंडिया ए संघाने ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्या नेतृत्वातील इंडिया सी (INDA v INDC) संघाला 132 धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावले.

(Mayank Agarwal Lead India A Won Duleep Trophy 2024)

अनंतपुर येथे खेळल्या गेलेल्या अखेरच्या दोन साखळी सामन्यात अखेरच्या दिवशी सामन्यांचे निकाल लागले. श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वातील इंडिया डी आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात इंडिया बी संघावर 357 धावांनी मोठा विजय मिळवला. मात्र, त्यांचा हा सर्धेतील पहिलाच विजय असल्याने, त्यांना विजेतेपदापासून वंचित रहावे लागले. त्यामुळे इंडिया ए विरुद्ध इंडिया सी या सामन्याला अंतिम फेरीचे स्वरूप आले होते. इंडिया सी संघाने आपले पहिले दोन सामने जिंकल्याने ते दावेदार मानले जात होते. तर, इंडिया ए संघाला पहिल्या सामन्यात पराभूत व्हावे लागलेले.

विजेतेपद जिंकण्यासाठी इंडिया सी संघाला 350 धावांचे मोठे लक्ष पार करायचे होते. मात्र, साई सुदर्शन (Sai Sudarshan) वगळता इतर फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. सुरुवातीला कर्णधार ऋतुराज गायकवाड याने 44 धावांची खेळी केली. तर, साई सुदर्शनने एकाकी किल्ला लढवताना 111 धावा बनवल्या. याव्यतिरिक्त कोणालाही 20 धावसंख्येपर्यंतही पोहोचता आले नाही. इंडिया ए संघासाठी तनुष कोटियान व प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. इंडिया ए साठी पहिल्या डावात शानदार शतक झळकावणारा शाश्वत रावत सामन्याचा मानकरी ठरला.

या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अनेक वरिष्ठ भारतीय क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदवला होता. त्यानंतर हे भारतीय खेळाडू बांगलादेश विरुद्धच्या मालिकेची तयारी करण्यासाठी चेन्नई येथे पोहोचले. या स्पर्धेचा अंतिम सामना न खेळता साखळी फेरीतील गुणांच्या आधारे विजेता घोषित करण्यात येणार होता.

(India A Won Duleep Trophy 2024)

IND v BAN: चौथ्या दिवशीच बांगलादेश चेन्नईत चीत! अश्विनच्या ऑलराऊंड कामगिरीने टीम इंडियाचा दणदणीत विजय

Exit mobile version