Breaking News

Paris Olympics 2024 साठी भारतीय हॉकी संघाची घोषणा! ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व, श्रीजेश पाचव्यांदा ऑलिंपिकमध्ये

paris olympics 2024
Photo Courtesy: X/Hockey India

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा करण्यात आली आहे. हॉकी इंडियाने (Hockey India) बुधवारी (26 जून) ही घोषणा केली. या 16 सदस्यीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) करेल. तर हार्दिक सिंग उपकर्णधार असेल.

अनुभवी गोलकीपर पीआर श्रीजेश (PR Sreejesh) आणि मनप्रीत सिंग यांचे हे चौथे ऑलिंपिक असेल. तर 5 खेळाडू पहिल्यांदा ऑलिंपिक मध्ये खेळतील. भारतीय हॉकी संघाने (Indian Hockey) मागील ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते.

गोलरक्षक: पीआर श्रीजेश

बचावपटू: जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), सुमित, संजय.

मध्यफळी : राजकुमार पाल, समशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद.

आघाडीपटू: अभिषेक, सुखजीत सिंग, ललितकुमार उपाध्याय, मनदीप सिंग, गुरजंत सिंग.

राखीव खेळाडू: नीलकांत शर्मा, जुगराज सिंग, कृष्ण बहादूर पाठक.

मुख्य प्रशिक्षक: क्रेग फुल्टन.

(Indian Hockey Team Annouced For Paris Olympics 2024)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version