
Ishan Kishan Hits Century In SMAT 2025 Final: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. झारखंड विरुद्ध हरियाणा अशा होत असलेल्या या सामन्यात झारखंडच्या फलंदाजांनी वादळी फलंदाजी करताना 263 धावा उभ्या केल्या. झारखंडचा कर्णधार ईशान किशन याने शतकी खेळी केली.
Ishan Kishan Hits Century In SMAT 2025 Final
अजिंक्य राहत अंतिम सामन्यापर्यंत पोहचलेल्या झारखंडने प्रथम फलंदाजी करताना तुफानी फटकेबाजी केली. विराट सिंग केवळ 2 धावांवर बाद झाल्यानंतर ईशान व कुमार कुशाग्र यांनी हरियाणाच्या गोलंदाजांना कसलीच संधी दिली नाही. दुसऱ्या गड्यासाठी 177 धावांची भागीदारी केली. फॉर्ममध्ये असलेल्या ईशानने केवळ 49 चेंडूंमध्ये 101 धावांची शतकी खेळी केली. यामध्ये 6 चौकार व 10 षटकारांचा समावेश होता.
दुसऱ्या बाजूला कुमार कुशाग्रने फक्त 38 चेंडूवर 81 धावा कुटल्या. अनुकूल रॉय याने 20 चेंडूत 40 व रॉबिन मिंझने 14 चेंडूत 31 धावा करत झारखंडची धावसंख्या विक्रमी 263 पर्यंत नेली.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: झारखंड पहिल्यांदाच चॅम्पियन! SMAT 2025 ची उचलली ट्रॉफी
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।