Breaking News

जागतिक क्रिकेटमध्ये ‘शाह’ साम्राज्य! Jay Shah बनले नवे आयसीसी चेअरमन, यापूर्वी या 4 भारतीयांना मिळालेला मान

jay shah
Photo Courtesy: X

Jay Shah New ICC Chairman: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह (Jay Shah) यांची आयसीसी चेअरमनपदी (Jay Shah ICC Chairman) बिनविरोध निवड झाली आहे. केवळ 35 व्या वर्षी त्यांनी हे पद मिळवले. सर्वात कमी वयात आयसीसी चेअरमन बनण्याचा विक्रम त्यांच्या नावे जमा झाला. या पदावर पोहोचलेले ते पाचवे भारतीय ठरले.

Jay Shah Elected As ICC Chairman

ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्यांदा आयसीसी चेअरमन होण्यास नकार दिल्यानंतर शाह यांची निवड होण्याची केवळ औपचारिकता बाकी होती. जय शाह यांना सर्व क्रिकेट बोर्डाच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिल्याने ते बिनविरोध निवडून आले. त्यांची ही निवड तीन वर्षांसाठी असेल. यानंतर शाह हे 2028 मध्ये पुन्हा एकदा बीसीसीआयमध्ये परतू शकतात.

जय शाह यांना क्रिकेट प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. त्यांनी वयाच्या केवळ 21 व्या वर्षी गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या एक्झिक्यूटिव्ह बोर्डचे सदस्य म्हणून काम पाहिलेले. त्यांनी 2009 ते 2013 पर्यंत या पदावर काम केल्यानंतर, पुढील दोन वर्ष गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव म्हणून काम केले. यानंतर 2015 मध्ये त्यांनी बीसीसीआयमध्ये प्रवेश केला. ते चार वर्ष फायनान्स व मार्केटिंग कमिटीचे काम पाहत होते. तर 2019 पासून ते बीसीसीआय सचिव या पदावर कार्यरत आहेत. यासोबतच आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांच्याकडे जबाबदारी आहे.

यापूर्वी हे पद भारताच्या शरद पवार, जगमोहन दालमिया, शशांक मनोहर व एन श्रीनिवासन यांनी भुषवले होते. क्रिकेट प्रशासनातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या या सर्व प्रशासकांमध्ये आता शाह यांचे नाव जोडले गेले आहे.

(Jay Shah Elected As New ICC Chairman)

Exit mobile version