Breaking News

John Cena या दिग्गजाविरूद्ध उतरणार रिंगमध्ये 25 वर्षापूर्वीची रायवलरी पुन्हा दिसणार

JOHN CENA
Photo Courtesy: X

John Cena In WWE Raw Night Of Champions: डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार जॉन सीना आपण एकदा डब्ल्यूडब्ल्यूई रॉ रिंगमध्ये दिसणार आहे. नाईट ऑफ चॅम्पियन्समध्ये तो दिग्गज सीएम पंक (CM Punk) याच्याविरुद्ध खेळताना दिसेल. दोघांनी परस्पर संमतीने या सामन्यासाठी होकार कळवला आहे. 

John Cena In WWE Raw Night Of Champions

या आठवड्याच्या सुरुवाती झालेल्या रॉमध्ये सीना रिंगमध्ये उतरला होता. त्यावेळी त्याने आपले काही दिवसच खेळाडू म्हणून असल्याचे म्हटले. त्यावर मध्येच पंक याने त्याला सामना लढण्याचे आव्हान दिले. सीनाने चॅम्पियनशिपचे हे आव्हान स्वीकारले. तसेच, पंकला नाईट ऑफ चॅम्पियन्समध्ये खेळण्यास विचारले. त्याला पंकने त्वरित होकार दिला. हे दोन्ही दिग्गज मागील जवळपास अडीच दशकांपासून एकमेकांविरुद्ध रिंगमध्ये उतरत आहेत.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: John Cena विश्वविक्रमी 17 व्यांदा WWE जगज्जेता, WrestleMania मधून घेतली कायमची एक्जिट

 

Exit mobile version