Breaking News

तब्बल 27 वर्षांनी Irani Trophy मुंबईकडे! रहाणेच्या नेतृत्वात संपला विजेतेपदाचा दुष्काळ

irani trophy
Photo Courtesy: X

Irani Trophy 2024: लखनऊ येथे झालेला इराणी ट्रॉफी (Irani Trophy 2024) सामना अनिर्णित राहिला. रेस्ट ऑफ इंडिया विरूद्ध मुंबई (Rest Of India v Mumbai) यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात रणजी विजेत्या मुंबई संघाने (Mumbai Cricket Team) पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर इराणी ट्रॉफी (Irani Trophy) आपल्या नावे केली. तब्बल 27 वर्षानंतर मुंबईने इराणी ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला. तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या नेतृत्वात मुंबईने सलग दुसरी महत्त्वपूर्ण स्पर्धा जिंकली.

रणजी ट्रॉफी विजेता आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्या दरम्यान ही स्पर्धा खेळली जाते. लखनऊ येथे झालेल्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना सर्फराज खान याच्या नाबाद द्विशतकाच्या जोरावर 537 धावा केल्या होत्या. त्याला कर्णधार अजिंक्य रहाणेने 97 व श्रेयस अय्यर याने अर्धशतक ठोकत साथ दिलेली. रेस्ट ऑफ इंडिया संघासाठी मुकेश कुमारने सर्वाधिक पाच बळी मिळवलेले.

यानंतर आपल्या पहिल्या डावात फलंदाजीला उतरलेल्या रेस्ट ऑफ इंडिया संघासाठी अनुभवी सलामीवीर अभिमन्यू ईस्वरन याने 191 धावांची लाजवाब खेळी केली. ध्रुव जुरेल याने 93 धावा करून, संघाच्या धावसंख्येत हातभार लावलेला. मात्र, मुंबईच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे त्यांची मजल 416 धावांपर्यंतच पोहोचली. पहिल्या डावात मिळालेली 121 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मुंबईसाठी निर्णायक ठरली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

दुसऱ्या डावात मुंबईसाठी अनुभवी पृथ्वी शॉ याने आक्रमक 76 धावा फटकावल्या. मात्र, इतर प्रमुख फलंदाज पूर्णतः अपयशी ठरले. अखेरच्या दिवशी तनुष कोटियान (नाबाद 114) याने दमदार शतक झळकावले. तर, मोहित अवस्थी याने देखील अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर अखेरच्या सूत्राचा खेळ सुरू होण्यापूर्वी, दोन्ही संघांनी सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला. द्विशतक झळकावणारा सर्फराज सामन्याचा मानकरी ठरला.

(Mumbai Won Irani Trophy 2024)

Sarfaraz Khan 200: रनमशिन सर्फराजची नव्या हंगामात तुफानी सुरुवात! इराणी ट्रॉफीमध्ये ठोकले द्विशतक

Exit mobile version