Breaking News

पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| Dhiraj Bommadevara मारणार मेडलवर बाण? टीमही ऐतिहासिक निकालासाठी सज्ज

dhiraj bommadevara
Photo Courtesy: X

Dhiraj Bommadevara In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक 2024 च्या पार्श्वभूमीवर क्रीडा कॅफेने सुरू केलेल्या मेडलचे 15 दावेदार या मालिकेतील पुढील दावेदार आहे तिरंदाज धीरज बोम्मदेवरा (Dhiraj Bommadevara).

(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Archer Dhiraj Bommadevara)

भारतीय पथक मागील चार ऑलिंपिकमध्ये दाखल झाल्यानंतर, ज्या एका खेळातून नेहमी पदकाची अपेक्षा असते तो खेळ म्हणजे तिरंदाजी. मात्र, भारतीय खेळाडूंचे व चाहत्यांचे दुर्दैव म्हणजे आत्तापर्यंत भारताला एकदाही या खेळात पदक जिंकता आले नाही. मागील तीन ऑलिंपिक्समध्ये भारताचे खेळाडू आणि संघ क्वार्टर फायनलपर्यंत जात होते. तिथे अपयश येत होते. परंतु, यंदा ही अपयशाची मालिका मोडली जाण्याची शक्यता धीरज बोम्मदेवरा याच्यामुळे निर्माण झाली आहे.

सध्या केवळ 22 वर्षाचा असलेला धीरज विजयवाड्याचा राहणारा. त्याचे वडील श्रवण कुमार हे आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियामध्ये टेक्निकल ऑफिसर म्हणून काम करतात. धीरज नेहमी आजूबाजूला तिरंदाजीचे वातावरण पाहत आला असल्याने त्याला साहजिकच या खेळाविषयी गोडी निर्माण झाली. या बरोबरीने त्याने उच्च शिक्षण देखील घेतले.

हे देखील वाचा – पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| Nikhat Zareen ठरणार डार्क हॉर्स? बॉक्सिंच्या दुसऱ्या मेडलची आस

धीरज बोम्मदेवरा हे नाव सर्वप्रथम 2021 ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर चर्चेत आले. हॅंगझू येथे झालेल्या 2022 एशियन गेम्स मध्ये सिल्वर जिंकणाऱ्या भारतीय रिकर्व संघाचा तो सदस्य होता. पुढे 2023 मध्ये त्याने जवळपास प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मेडल नावे केले. यावर्षी त्याने आर्चरी वर्ल्डकपमध्ये सुवर्णपदक जिंकून आपण फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले आहे.

पॅरिसमध्ये तो भारतीय संघाला तीन प्रकारात मेडल जिंकून देऊ शकतो इतकी त्याची पात्रता आहे. तरुणदीप रॉय व प्रवीण जाधव यांच्यासोबत पुरुष सांघिक प्रकारात तो तगडे आव्हान सादर करणार हे नक्की आहे. दुसरीकडे मिश्र प्रकारात अंकिता भकतसह उलटफेर करण्याची ताकद तो ठेवतो. या व्यतिरिक्त वैयक्तिक प्रकारात तो मेडलचा सर्वात मोठा दावेदार दिसून येतो. त्याच्या रूपाने कदाचित भारताच्या वाट्याला कमीतकमी एक ब्रॉंझ येताना दिसत आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics Archer Dhiraj Bommadevara)

अधिकचे वाचा-

Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार: कहाणी ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची! 140 कोटी भारतीयांना अपेक्षा दुसऱ्या सुवर्ण फेकीची

 Paris Olympics 2024:‌ ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| गोष्ट फुलराणी पीव्ही सिंधूची! देशाला आशा मेडल हॅट्रिकची

Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| फायटर लवलिना पॅरिसमध्ये लगावणार गोल्डन पंच?

Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| 140 कोटी भारतीयांच्या अपेक्षांचा भार उचलायला मीराबाई सज्ज, यंदा लक्ष्य गोल्डच!

Paris Olympics 2024: मेडलचे 15 दावेदार| हॉकीला पुन्हा येणार ‘सोन्या’चे दिवस, वाचा भारतीय हॉकीचा गौरवशाली इतिहास

पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| Satwik-Chirag कडून मेडलची गॅरंटी? बॅडमिंटन विश्वात त्यांचीच चर्चा

पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| ‘देश की बेटी’ Vinesh Phogat यंदा देणार धोबीपछाड

पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| Nikhat Zareen ठरणार डार्क हॉर्स? बॉक्सिंच्या दुसऱ्या मेडलची आस

Exit mobile version