Breaking News

PKL 12: पहिल्याच दिवशी टायब्रेकरचा रोमांच! थलायवाज- पलटनची विजयी सलामी

pkl 12
Photo Courtesy: X

PKL 12 Day 1 Result: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) च्या पहिल्या दिवशी दोन सामने खेळले गेले. तेलुगू टायटन्स विरूद्ध तमिल थलायवाज या उद्घाटनाच्या सामन्यात थलायवाजने टायटन्सला पराभूत केले. तर, पुणेरी पलटन विरुद्ध बेंगळुरू बुल्स हा दुसरा सामना टायब्रेकरपर्यंत रंगला. यामध्ये पुणेरी पलटनने बाजी मारली.

PKL 12 Day 1 Result

नव्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात दक्षिणेतील तेलुगू टायटन्स व तमिल थलायवाज हे संघ समोरासमोर आले. दोन्ही संघादरम्यान अत्यंत रोमांचक लढत यावेळी पाहायला मिळाली. पवन सेहरावत याने नेतृत्वाला साजेशी कामगिरी करत नऊ गुण मिळवत थलायवाजचा विजय निश्चित केला. अखेरच्या मिनिटापर्यंत हा सामना रंगला. ज्यामध्ये,‌ थलाजवाजने 38-35 अशी सरशी साधली.

दिवसातील दुसरा सामना पुणेरी पलटण विरुद्ध बेंगलुरू बुल्स असा रंगला. पुण्याचे रेडर विरुद्ध बेंगलुरुचे डिफेंडर अशा झालेल्या या सामन्यात पूर्ण वेळेत 31-31 अशी बरोबरी राहिली. पुण्यासाठी आदित्य शिंदे तर बुल्ससाठी आकाश शिंदे यांनी आक्रमक चढाया केल्या. अखेर, टायब्रेकरमध्ये पुण्याच्या डिफेन्सने बाजी मारली. विशाल भारद्वाज यांनी शेवटच्या रेडवेळी बुल्सच्या रेडरची पकड करत आपल्या संघाला टायब्रेकर 6-4 अशा गुणसंख्येने जिंकून दिला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: आजपासून रंगणार PKL 12 चा थरार, वाचा स्पर्धेविषयी सर्व काही

Exit mobile version