Breaking News

Pro Kabaddi 2025 चे टाइमटेबल आले! सदर्न डर्बीने होणार सुरूवात

pro kabaddi 2025
Photo Courtesy; X

Pro Kabaddi 2025 Timetable: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या 12 व्या हंगामाचे वेळापत्रक समोर आले आहे. या स्पर्धेची सुरुवात 29 ऑगस्टपासून विझाग येथे होईल. स्पर्धेतील पहिला सामना तमिल थलायवाज विरूद्ध तेलूगू टायटन्स असा रंगेल. विशेष म्हणजे यावेळी स्पर्धेतील सामन्यांची संख्या कमी करण्यात आली आहे.

Pro Kabaddi 2025 Timetable

प्रो कबड्डी 2025 यावेळी पाच शहरांमध्ये खेळली जाईल. यामध्ये विझाग, जयपूर, दिल्ली व चेन्नई या शहरांचा समावेश आहे. प्ले ऑफ्स सामन्यांच्या ठिकाणाची अद्याप घोषणा झाली नाही. या हंगामात प्रत्येक संघ केवळ 12 सामने खेळताना दिसले. याआधी प्रत्येक संघाला 22 सामने खेळण्याची संधी मिळत होती. एक संघ सात संघांविरुद्ध दोन तर चार संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. अखेरच्या आठ दिवसात प्रत्येकी तीन सामने खेळले जातील. अखेरचे साखळी सामने 23 ऑक्टोबर रोजी पार पडतील.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: PKL 12 साठी सर्व संघांची तयारी सुरू! महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी चार संघांचा सराव

Exit mobile version