Breaking News

UCL Final 2024| डॉर्टमंडला हरवत Real Madrid ने 15 व्यांदा जिंकली ट्रॉफी, विनिशीयसचा गोल्डन गोल

ucl final 2024
Photo Courtesy: X/Real Madrid FC

UEFA Champions League Final|युरोपियन फुटबॉल मधील सर्वात मोठी स्पर्धा मानल्या जाणाऱ्या युएफा चॅम्पियन्स लीग स्पर्धेचा अंतिम सामना (UCL Final 2024) रविवारी (2 जून) खेळला गेला. स्पॅनिश क्लब रियाल माद्रिद विरुद्ध जर्मन क्लब बोर्शुआ डॉर्टमंड यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात रियाल माद्रिद (Real Madrid) संघाने 2-0 असा विजय मिळवला. यासह त्यांनी विक्रमी 15 व्या वेळी ही स्पर्धा आपल्या नावे केली.

लंडन येथील वेंबली स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात पहिल्या हाफमध्ये एकही गोल नोंदवला‌ गेला नाही. दुसऱ्या हाफमध्ये 57 व्या मिनिटाला डॅनी कार्वाहाल याने गोल नोंदवत माद्रिदला आघाडीवर नेले. त्यानंतर डॉर्टमंडच्या खेळाडूंनी बरोबरीसाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपयश आले. विनिशीयस जुनिअर याने 83 व्या मिनिटाला गोल करत माद्रिदचा विजय जवळपास पक्का केला. अखेर याच फरकाने त्यांनी विजय मिळवला.

हा स्पर्धेचा 32 वा हंगाम होता. माद्रिदने त्यापैकी तब्बल 18 वेळा अंतिम सामना आहे. दुसरीकडे डॉर्टमंड तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत होता. मात्र, त्यांना एकदाही विजेतेपद  जिंकता आले नाही. माद्रिद 15 विजेतेपदानंतर इटलीचा क्लब एसी मिलानने 7 वेळा चॅम्पियन्स लीग जिंकली आहे.

(Real Madrid Won UCL Final 2024)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version