Breaking News

मानलं तुला Shardul Thakur! अनसोल्ड राहिल्यानंतर केला ‘लॉर्ड’ कमबॅक, 2025

shardul thakur
Photo Courtesy: X

Shardul Thakur Comeback: आयपीएल 2025 (IPL 2025) चा चौथा सामना दिल्ली कॅपिटल विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स (DCvLSG) असा खेळला गेला. या सामन्यात लखनऊ संघासाठी मुंबईचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) खेळतोय. भारतीय संघातून बाहेर, दुखापत आणि त्यानंतर आयपीएल लिलावात अनसोड राहिल्यानंतर त्याने आपल्या पुनरागमनाच्या पहिल्याच षटकात आपला दर्जा दाखवून दिला.

Shardul Thakur Comeback In IPL 2025

शार्दुल ठाकूर हा 2023 वनडे विश्वचषकानंतर भारतीय संघातून बाहेर झाला होता. त्यानंतर त्याला दुखापत झाली. यातून सावरल्यानंतर 2024 आयपीएलमध्ये त्याची कामगिरी विशेष राहिली नाही. डिसेंबर महिन्यात झालेला आयपीएल 2025 लिलावात कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लागली नव्हती. यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली.

आयपीएल 2025 च्या आधी लखनऊ सुपरजायंट्स संघात त्याचा नेट बॉलर म्हणून समावेश केला गेला. झहीर खान याच्या मार्गदर्शनात त्याने संघ व्यवस्थापनाला प्रभावित केले. लखनऊचा युवा वेगवान गोलंदाज मोहसीन खान दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर झाल्यानंतर, शार्दुल याला त्याचा बदली खेळाडू म्हणून, संघात सामील करून घेतले. त्याने संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय सार्थ ठरवला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

लखनऊचा हंगामातील पहिला सामना खेळताना त्याने, संघासाठी पहिले षटक टाकले. या पहिल्या षटकात त्याने दिल्लीचा प्रमुख फलंदाज जॅक फ्रेझर-मॅकगर्क व अभिषेक पोरेल यांना तंबूचा रस्ता दाखवत आपल्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. या कामगिरीनंतर सर्व जनतेचे कौतुक करत आहेत.

(Shardul Thakur Comeback In IPL 2025)

हे देखील वाचा- कोण आहे मुंबईचा नवा भिडू Vignesh Puthur? फक्त 2 मॅच आणि आयपीएल कॉन्ट्रॅक्ट, वाचा पूर्ण स्टोरी

Exit mobile version