
Sports Grace Marks For 10th & 12th Students: महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या तोंडावर आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री (Maharashtra Sports Minister) माणिकराव कोकाटे यांनी 44 क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना क्रीडा सवलत गुणांचा फायदा मिळणार असल्याचे जाहीर केले. शालेय खेळ क्रीडा महाराष्ट्र राज्य यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.
Sports Grace Marks For 10th & 12th Students
राज्यातील 44 क्रीडा प्रकारांचा गुणांकनांमध्ये समावेश करावा, याबाबतची मागणी मागील गेल्या 10 ते 11 वर्षांपासून शालेय खेळ क्रीडा महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष शाम भोसले हे सातत्याने करत होते. या क्रीडा प्रकारांमध्ये जवळपास 4 लाखांपेक्षा जास्त खेळाडू सहभागी होतात. त्यानंतर आता क्रीडामंत्र्यांनी हे गुणांकन देण्यास मंजुरी दिली.
समाविष्ट करण्यात आलेले खेळ: आष्टे-डू-आखाडा, युनिफाईड, कुडो, स्पीडबॉल, टेंग-सु-डो, फिल्ड आर्चरी, मॉंटेक्सबॉल क्रिकेट, मिनीगोल्फ, सुपर सेवन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, फ्लोअरबॉक्स, थायबॉक्सिंग, हाफकिडो बॉक्सिंग, रोप स्किपिंग, सिलंबम, वूडबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, थांग ता मार्शल आर्ट, कुराश, लगोरी, रस्सीखेच, पॉवरलिफ्टिंग, बीच व्हॉलीबॉल, टार्गेट बॉल, टेनिस क्रिकेट, जित कुने दो, फुटसाल, कॉर्फबॉल, टेबल सॉकर, हुप क्लॉन दो, युग मुन दो, वोमीनाम, ड्रॉप रो बॉल, ग्रॅंपलिंग, पेंटाक्यू, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट डान्स, चॉकबॉल, चायक्वांदो, फुटबॉल टेनिस, बुडो, म्युझिकल चेअर व टेनिस बॉल क्रिकेट.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Womens Kabaddi World Cup 2025: सलग तिसऱ्या विजयाने भारताच्या उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा